Home Breaking News गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; तीन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व...

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; तीन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध

14

यवतमाळ दि. ७ ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72813 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71013 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2159 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 12 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 775 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 753 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

यवतमाळ दि. ७ आॅगस्ट : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 9 आॅगस्ट 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि.9 आॅगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला स्वामी समर्थ हाॅल, बायपास रोड, यवतमाळ येथे उपस्थित. दु. 1 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट. दु. 1.30 ते 2 राखीव. दु. 2.15 वा. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदतकार्य यावर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 3.15 वा. इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभाग यवतमाळ जिल्हा आढावा बैठक. साय. 4.00 वा. पत्रकार परिषदेला उपस्थिती. सायं. 4.30 वा. नागपूरकडे प्रयाण करतील.

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेशप्रकियेला १३ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ

यवतमाळ दि.७ आॅगस्ट : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रकिया राज्यभरात ऑनलाईन पध्दतीने सुरु झालेली आहे. याची अंतिम मुदत दि. ६ आॅगस्ट २०२१ होती. परंतु प्रथम वर्षाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे दि. १३ आॅगस्ट २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. प्रवेशच्छुक विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून अर्ज नोंदणी करता येणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रकियेकरीता नोंदणी करुन प्रवेश अर्ज भरावे व वाढीव मुदतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी केले आहे.
______________________________________
*गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावाविषयी जागृत राहणे गरजेचे* – नवनाथ कोळपकर
यवतमाळ दि. ७: मागील काळातील अनुभव लक्षात घेऊन गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावा विषयी शेतक-यांच्या मनात धास्ती भरणे साहजिकच असले तरी घाबरून महागडे किटकनाशकांचा अवाजवी वापर करणे योग्य नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.
नवनाथ कोळपकर यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी एस.जे थोरात, कृषि अधिकारी नालंदा भरणे मंडळ , कृषि सहायक प्रल्हाद बोइनवाड व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यासह विद्यापिठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व तथा विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी तिवसा, कामठवाडा, चाणी, परिसरात जाऊन निरक्षण केले असता गुलाबी बोंडअळीचे प्रमाण २ टक्के पर्यत फुलामध्ये आढळले. कामठवाडा येथिल प्रगतशील शेतकरी शिवशंकर ठोकळ यांच्या शेतात डोम कळ्या आढळुन आले. प्रक्षेत्र भेटी दरम्याण उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विभागाचे
अधिकारी व शास्त्रज्ञानी मार्गदर्शन केले. सुरवातीच्या ४० ते ६० दिवसा दरम्यान रासायनिक खताची मात्रा शिफारसीनुसारच द्यावे. एकरी किमान 2 कामगंध सापळे लावावेत. पेरणी नंतर ४५ दिवसानी ट्रायकोग्रामा बॅक्टरी या परोपजीवी किटकाचे एकरी तीन कार्ड १० दिवसाच्या अंनतराने सहा वेळा शेतात लावावे. प्रत्येक
कार्डाचे २० पट्टया कापुन लावावे. ४५ ते ६० दिवसानी ५ टक्के निंबोळी अर्क अथवा अॉडीरॅक्टीन ०.५० टक्के प्रवाही २५ मिली किंवा बिक्टरिया बॅसियाना १.१५ टक्के ५० ग्रॅ. प्रति १० लीटर पाणी फवारावे असा सल्ला कृषि विभाग व विद्यापिठ शास्त्रज्ञानी दिला. प्रक्षेत्र भेटी दरम्याण गाजीपुरचे उद्यानपंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी जगदिश चव्हाण, सरपंचा छायाताई डावरे, शिवशंकर ठोकळ, गुणवंता ठोकळ, पंडीत हिगासपुरे, सुरेश ढवळे, सुशिल ठोकळ अरविद ठोकळ, इत्यादी शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©