Home यवतमाळ माझे आई-वडील शोधून द्या हरवलेल्या मुलीची आर्त हाक

माझे आई-वडील शोधून द्या हरवलेल्या मुलीची आर्त हाक

11

यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : पुसद येथिल सीमा झेरॉक्स , मोती नगर येथे एक ३ वर्षाची बालिका रडत असताना मातृभूमी सामाजिक संस्था यांना आढळून आली. तिला आपले नाव किंवा सांगता येत नाही त्यावरून ती मतीमंद असल्याचे दिसून आले. तेव्हा तिला पोलीस स्टेशन पुसद यांच्या मार्फत बाल कल्याण समिती यवतमाळ यांच्या कडे सादर करण्यात आलेले आहे.

सादर बालीकेबाबत आपणस कोणतेही माहिती असल्यास या बाबत माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दूसरा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, बाल कल्याण समिती यवतमाळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, यवतमाळ किंवा ८८८८४६०२६० या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांनी केली आहे.

 

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : सद्यपरिस्थित यवतमाळ तालुक्यात कपाशी पिकावर कोणत्याही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला नसला तरीही 50 ते 55 दिवसाच्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तरी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे

मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून नत्र युक्त खतांचा अवाजवी वापर टाळावा, जेणेकरून पिकाची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही व पिक दाटणार नाही याची काळजी घ्यावी. बांधावरील तसेच शेताच्या सभोवताली असणाऱ्या किटकाच्या पर्यायी खाद्य वनस्पती (अंबाडी, रानभेंडी) नष्ट कराव्या. शेतात पक्षी थांबे उभारावेत ज्यामुळे पक्षी बसून अळ्या/किडी टिपून खातील. कपाशीवरील बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठी कापूस जिनिंगच्या मिल व मार्केट यार्डच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे (प्रती १० मीटर अंतरावर १ कामगंध सापळा ) तसेच किमान ४ ते ५ प्रकाश सापळे लावून आकर्षित झालेले किटक नष्ट करावे. फुले व बोंडे लागण्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने नर पतंग जेरबंद करण्यासाठी प्रती एकर १० ते १२ कामगंध सापळे लावावे व सापळ्यात अडकलेले पतंग वेळेच्या वेळी नष्ट करावेत. लिंग प्रलोभने कालबाह्य झाल्यास बदलावीत. या सापळ्यामध्ये २ ते ३ दिवस सतत ७ ते ८ पतंग आढळून आल्यास त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतात प्रकाश सापळे हेक्टरी ४ ते ५ लावावेत, बोंडअळीग्रस्त फुले/डोमकळ्या आढळल्यास अशी फुले त्वरित तोडून अळीसह नष्ट करावे. बोंडअळीची अंडी किवा प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसू लागताच ट्रायकोग्रामा ब्याक्त्री किंवा ट्रायकोग्रामा चीलोणीस या परोपजीवी किटकाची १ ते १.५ लाख अंडी या प्रमाणात दर आठवड्याने ३ ते ६ वेळा कपाशीच्या शेतात सोडावी. या कालावधीमध्ये कोणतेही किटकनाशक फवारू नये. गुलाबी बोंडअळीचा प्राथमिक स्वरुपाचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ % या वनस्पती जन्य किटकनाशकाची किंवा अझाडीरेक्तीन ३०० पीपीएम ५० ते १०० मिली किंवा अझाडीरेक्तीन १५०० पीपीएम @ ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बिव्हेरिया बेसियाना १.१५% विद्राव्य भुकटी ५० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून शेतात आद्रता असताना फवारणी करावी. रासायनिक किटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. पांढरी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकांचा वापर टाळावा.

गुलाबी बोंडअळीचे रासायनिक व्यवस्थापन: किडींच्या सर्वेक्षनाअंती गुलाबी बोंडअळ्यांनी ५-१० % किडग्रस्त पात्या, फुले, बोंडे किंवा कामगंध सापळ्यात सरासरी ७ ते ८ नर पतंग सतत २ ते ३ दिवस हि आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच कोणत्याही एका लेबल क्लेम निहाय शिफारशीत किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंडअळी करिता केंद्रीय किटकनाशक मंडळ,फरीदाबादद्वारा लेबल क्लेम किटकनाशके क्विनोलफॉस 20 ए.एफ. 23 ते 25 मिली, क्लोरपायरिफॉस 50 टक्के इसी 12 ते 20 मिली, थायोडीकार्ब 75 डब्ल्यु.पी. 20 ग्राम, इमामेक्टीने बेन्झोएट 5 एस.जी. 3.8 ते4.4 ग्राम, इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के इ.सी. 10 मिली, क्लोरोपायरीफॉस 16 टक्के+अल्फा सायपरमेथ्रीन 1 टक्के इ.सी. 33 ते 50 मिली, क्लोरणट्रानिलीप्रोल 9.3 टक्के + लेम्ब्डा सायाहालोथ्रीन 4.6 टक्के झेड.सी., डेल्टामेथ्रीन 1 टक्का+ट्रायझोफॉस 35 टक्के इ.सी. 12.5 ते 16.7 मिली, क्लोरपायरिफॉस 50 टक्के+ सायपरमेथ्रीन 5 टक्के इ.सी. 10 ते 20 मिली. किटकनाशके हिरवी,ठिपक्याची व गुलाबी बोंडअळी या तिन्ही बोंडअळीची शिफारशीत आहेत.

केंद्रीय किटकनाशक मंडळ फरीदाबादद्वारा शिफारशीत कोणत्याही एका किटकनाशकाची आलटून पालटून आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकांचा वापर ऑक्टोबर महिन्यापूर्वी करू नये.

ऑगस्ट महिना- निंबोळी अर्क ५%किंवा अझाडीरेकटीन ३०० पीपीएम हे किटकनाशक ५० ते १०० मिली किंवा अझाडीरेकटीन १५०० पीपीएम ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% इसी २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात किंवा वरील पैकी कोणतेही एक लेबल क्लेम असलेले किटकनाशक.(सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकाव्यतिरिक्त)

सप्टेबर महिना- क्लोरपायरीफॉस ५०% इ सी १२ ते २० मिली किंवा क्वीनॉलफॉस २० एएफ २३ ते २५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लू पी २० ग्राम प्रति १० लिटर पाणी किंवा वरील पैकी कोणतेही एक लेबल क्लेम

असलेले किटकनाशक.(सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकाव्यतिरिक्त)

ऑक्टोबर महिना- क्लोरपायरीफॉस ५०% इ सी १२ ते २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लू पी २० ग्राम प्रति १० लिटर पाणी किंवा वरील,पैकी कोणतेही एक लेबल क्लेम असलेले किटकनाशक.

नोव्हेंबर महिना-फेनव्हलरेट २० इसी ५.५ मिली किंवा सायपरमेथ्रीन १० ए सी ७.५ मिली प्रति १० लिटर पाणी किंवा वरील पैकी कोणतेही एक लेबल क्लेम असलेले किटकनाशक.

उपरोक्त किटकनाशकाच्या मात्रा केंद्रीय किटकनाशक मंडळ, फरीदाबादद्वारा शिफारशीनुसार आहेत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच किटकनाशकांची फवारणी शिफारशीत शेवटचा पर्याय म्हणून करावी. फवारणी करताना अंगरक्षक कपडे, चष्मा, हातमौजे, टोपी, मास्क वापरूनच फवारणी करावी. एकाच किटकनाशकाची वारंवार फवारणी करणे टाळावे. पुढील फवारणी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास १५ दिवसांच्या अंतराने करावी. किटकनाशकामध्ये इतर कोणतेही रसायन मिसळून फवारणी करू नये.

_____________________________________
७ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात ‘मध्यस्थी जागृती कार्यक्रम’

यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : जिल्हा मध्यस्थी केंद्र, जिल्हा न्यायालय, यवतमाळ तर्फे दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील दूसऱ्या माळ्यावरील सभागृहात दुपारी 2 वाजता मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात पुढील तीन महिन्यामध्ये ज्या पक्षकारांची प्रकरणे नेमलेली आहेत असे सर्व पक्षकार, त्यांचे वकील आणि इतर इच्छुक व्यक्ती सहभागी होवू शकतात.

तरी या मध्यस्थी जागृती कार्यक्रमात संबंधीतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यस्थ केंद्राचे समन्वयक एम.आर.ए.शेख यांनी केले आहे.

____________________________________
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन

 

यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्याकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन, नोकरीच्या जास्तीत संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसाईक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी बोधचिन्ह (LOGO) स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेऊ शकतात. तसेच या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट, २०२१ आहे.

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना रु.५०,०००/- रु.३०,०००/- व रु.२०,०००/- पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

____________________________________

अणाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करायची मुदत 12 ऑगस्ट

यवतमाळ दि. 5 ऑगस्ट : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यवतमाळ मार्फत 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीसह विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांतग समाज व तत्सत 12 पोटजातीतील विद्यार्थींना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

तरी मांतग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे संपर्क साधून दिनांक 12 ऑगस्ट 2021 पुर्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावे, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
____________________________________

Copyright ©