यवतमाळ येथील वाघापूर नाक्यावर गंगा अवतरल्याने ये जा करणार्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे संपूर्ण शहरात नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली या लाईनचे काम दोन महिन्या पूर्वी पूर्ण झाले आणि तीच पाईप लाईन फुटली हजारो लिटर पाणी रस्त्याने मागील तीन दिवसा पासुन वहात आहे आणि येथील रहिवाशी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे या फुटलेल्या पाईप लाईन मधून पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असताना सुद्धा पाणी पुरवठा विभाग झोपेत आहे एकीकडे वरुन राजा बरसत आहे आणि खालून पाणी पुरवठा विभाग पाणी सोडत आहे या होत असलेली अनागोंदी कारभाराने पूर्ती जनता वैतागली आहे विशेष म्हणजे नगर सेवक हि फिरकले नसल्याने सर्व सामान्य जनते मध्ये चर्चेला उधाण आले आहे तरी याची तातडीने दखल घेऊन पाण्याचा होणार अपवेय थाबविण्या यावा अशी मागणी जणते कडून करण्यात येत आहे
