Home यवतमाळ अखेर मदर डेअरि कडून दुधाच्या दरात वाढ करण्यात आली

अखेर मदर डेअरि कडून दुधाच्या दरात वाढ करण्यात आली

14

तालुक्यात गाव तिथे मदर डेअरि हा उपक्रम काही वर्षापूर्वी एन.डी.डी.बी मार्फत राबवण्यात आला होता त्या अनुषंगाने ज्या गावात दूधाच उत्पादन जास्त आहे अशा ठिकानी मदर डेअरि चे दुध संकलन केंद्र उघडण्यात आले मात्र मद्यान्तरीत लॉकडाऊन च्या काळात मदर डेअरि कडून दुधाच्या दरात फार घसरण करण्यात आली होती.
दी.30जुन रोजी वर्धा जिल्याचे पालकमंत्री सुनिल केदार याना सेलू येथे दुध दर वढिबाबत निवेदन देण्यात आले होते त्या ठिकानी तालुक्यातील डेअरि संचालक व उत्पादक उपस्तीत होते सर्व डेअरि संस्थान्सोबत बैठक घेऊन दुध दरात वाढ करण्यात येईल असे त्यांच्याकडून सागंन्यात आले होते.आता मात्र तब्बल दिड वर्षानात्तर पहिल्यांदा मदर डेअरि च्या दुध दरात 2 रुपयनी वाढ करण्यात आली आहे दुध उत्पादन खर्चात वाढ झाली असल्यामूळे दुध दरात वाढ करण्यात आली दुधाच्या किमतीच्या 80टक्के भाग हा शेत्कर्यन्ना जावा हा मदर डेअरि चा उद्धेश मानल्या जातोअसे डेअरि कडून सांगण्यात येत आहे.
तालुक्यात काही जंगल व्याप्त भागातील गावात दुधाच्या उत्पादनावरच त्यांची उपजीविका असते अश्या उत्पादकांना दुध दर वाढीमुळे दिलासा मिळाला आहे. “फुल ना फुलाची कळी तरी मिळाली” दुध उत्पादकानकडून व्यक्त होत आहे तसेच बाकी खाजगी डेअरि संस्थांचे सुधा दुध दरात वाढ होणार आहे सांगण्यात येत आहे

Copyright ©