यवतमाळ, दि. 30 जून : महसूल व वन विभागाच्या 4 जुन रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन मध्ये सुधारणा करण्यात येवून स्वामित्वधनाचे सुधारित दर दिनांक 01 जुलै,2021 पासून लागू करण्यात आले आहे. गौण खनिजाचे वापराबाबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो अशा जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम इ सर्व कार्यालये यांनी सदर शासन अधिसूचनेची दि. 01 जुलै 2021 पासून अंमलबजावनी बाबत आवश्यक सुचना निर्गमित कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.
