घाटंजी तालुक्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या सायफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे राजर्षी शाहू महाराजांने सर्व सामान्यांना न्याय मिळावे न्यायासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरले पाहिजे या क्रांतिकारक पुरोगामी निर्णय घेतले मोफत शिक्षण आरक्षण सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अशा समतेची शिकवण देणाऱ्या थोर पुरुष राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज सायफळ येथील जिल्हा परिषद शाळेत जयंती साजरी करण्यात आली या वेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सरपंच चंद्रपाल वेट्टी उपसरपंच विलास बंडीवार शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुनेश्वर सह ग्रामस्थ उपस्थित होते
