दोन वर्षांपासून कामे अर्धवट गावात अस्वच्छतेचा कळस
तालुक्याच्या टोकावर असलेल्या आमगाव (म) ग्रामपंचायत मध्ये सरपंचाचा मनमानी कारभार सुरू असून विकास कामे दोन ते तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहेत, तर जागोजागी अस्वच्छता पसरली असून पुनर्वसित गावात असंतोष पसरला आहे.
तालुक्याच्या जंगलव्याप्त भागात अगदी सेलू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर ग्राम पंचायत आमगाव(म) ही ग्राम पंचायत असून सध्या येथे सरपंचाचा मनमानी कारभार सुरू असल्याची ओरड होत आहे.चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर अद्यापही मुरुमाच्या कडा भरलेल्या नाहीत त्यामुळे खाईत पडून किरकोळ अपघात नित्याचीच बाब झाली आहे तर कडा नसल्यामुळे रस्त्याचे नुसकानही होत आहे.दोन वर्षांपूर्वी येथील स्मशान भूमीचे काम सुरू झाले परंतु अद्यापही ते पूर्णत्वास गेले नाही.या बाबतीत मात्र ग्राम पंचायत प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.बिगर सिमेंट रस्त्यावर शेणामातीचे ढिगारे साचले असून घानीमुळे रोगराईचे भीती निर्माण झाली आहे.घाण हटविण्याबाबत हेतुपुरस्पर कारवाई करण्यात येत असून नोटीस देण्याबाबत भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.या ठिकाणी एका वर्षाआगोदार व्यायाम शाळेचे उदघाटन झाले परंतु अद्याप ही कामाला सुरुवात झाली नाही
–—————————
येथील सरपंच व ग्रामसेविका हे वर्धा येथे राहात असून त्यांचे आमगाव येथे आगमन नगण्य असते त्यामुळे गावातील विकास कामावर व समस्येवर दुर्लक्ष होत आहे.
बंडूजी सकंडे , ग्रामस्थ आमगाव
——————————–
याबाबतीत ग्रामसेविका जया राठोड यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, स्मशान भूमीचे काम अर्धवट असून हे काम ठेकेदाराने सोडले आहे आता नियोजन करून ते काम करण्यात येईल तर व्यायाम शाळेसाठी नियोजित केलेली जागा ही वनविभागाची असल्याने ते काम बंद केले आहे आता पंचकमेटी ने जागा ठरविल्यानंतर काम सुरू करण्यात येईल.असे सांगितले तर सरपंच अभय ढोकने यांनी मोबाईल रिसव केला नाही
