गोदावरी अर्बनकडून छत्र्यांचे वितरण
-किरकोळ व्यावसायिकांना दिलासा, दत्त चौक व मेन लाईन शाखेचा उपक्रम
यवतमाळ, ता. १५ : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नांदेडच्या यवतमाळ येथील दत्त चौक व मेन लाईन शाखेतर्फे शहरातील गरजवंत किरकोळ व्यावसायिकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून स्टॅडसह छत्रीचे वितरण सोमवारी (ता. 14) करण्यात आले.
शहरातील दर्डानगर, स्टेट बँक चौक, आर्णी नाका चौक, नेहरू चौक, मेन लाइन या परिसरातील भाजीविक्रेते, फळविक्रेते, पानविक्रेते, चहा कँटीन चालविणार्या किरकोळ व्यावसायिकांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
संस्थापक खासदर हेमंत पाटील, संथेच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील व व्यवस्थापकिय संचालक धनंजय तांबेकर यांच्या संकल्पनेतून गोरगरीब व्यक्तीना तसेच व्यवसायाची जिद्द बाळगणाऱ्या व्यक्तीना एक मायेचा हात म्हनून सुंदर अश्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी दत्त चौक शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवी इंगळे, मेन लाइनमधील शाखेचे व्यवस्थापक अमीत पिंपळकर, तसेच सहाय्यक व्यवस्थापक अनिकेत मोहदरे, अमित निकम व अधिकारी आकाश चोले, स्वप्नील झालपे, सौरभ काळे, छोटू हरणखेडे व कनिष्ठ अधिकारी शीतल कदम आदींची उपस्थिती होती.
