Home यवतमाळ जळीतकांड प्रकरणातील पिंडीच्या परीवाला सरकारकडून मदतीसाठी पाठपुरावा करणार: सामाजिक मगला ठक

जळीतकांड प्रकरणातील पिंडीच्या परीवाला सरकारकडून मदतीसाठी पाठपुरावा करणार: सामाजिक मगला ठक

11

 

जळीतकांड प्रकरणातील पिंडीच्या परीवाला सरकारकडून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार: सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक हिंगणघाट येथिल जळीतकांड होऊन वर्ष उलटून गेले आहे. आहे. ३ फेब्रुवारीला २०२० ला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्याची दुर्दैवी घटना घडली होती. आणि १० फेब्रुवारी २०२० ला फरवरी अंकिताने प्राण सोडले.या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला होता.आज रविवारी १३ जुनला सामाजिक कार्यकर्ता व काँग्रेस तालुका अध्यक्षा मंगलाताई ठक यांनी दारोडा गावाला जाऊन त्यांनी मृत्यू अंकिताचे वडील अरुण पिसुड्डे आणि आई संगीता पीसुड्डे भाऊ प्रज्वल पिसूड्डे यांची भेट घेऊन परीवाराची विचारपूस केली. यावेळी पिडीतेच्या परीवारातील सदस्य म्हणाले की आमच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात वरिष्ठ सरकारी वकील उज्वल निकम लढत आहे.मात्र आपल्याला सरकार कडून एकही रुपयाची मदत मिळालेली नाही व मुलाला नौकरी सुध्धा मिळालेली नाही.सरकारनी केवळ आश्वासन दिले असल्याचे दुखः अंकिताचा आई वडिलांनी व्यक्त केले . चित्रा वाघ व अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार आले आणि भेटून गेले परंतु सरकार कडून मदत अजूनही एक रुपयाची मिळालेली नाही असे सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांनी आपण सरकारला आश्वासनांची आठवण करून देऊन या गोष्टीचा सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Copyright ©