———————————————
दारव्हा ते यवतमाळ महामार्गावरील तिन तास वाहतूक खोळंबली
———————————————
रविवारच्या वादळी पावसाने केला चांगलाच कहर
——————————————–
बोरी अरब (प्रतिनिधी) १३ जुन रविवारला दुपार दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा व वाऱ्याचा वोघ एवढा भयंकर होता की एका तासातच चक्क वाहतूक व्यवस्था कोलमडून तीन तास अख्खा रस्ता जाम झाला होता.
दारव्हा ते यवतमाळ महामार्गावरील बोरी अरब च्या जवळपास रविवारला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात या रस्त्याच्या कडेला असलेल्या ब्रिटिश कालीन निंबाचे मोठं मोठे झाडे कोलमडून पडली. त्यामुळे मार्गस्थना मार्ग कठीण झाले होते. त्यामुळे सर्वच वाहतूक अडकून पडली होती. कालांतराने जेसीबी साहाय्याने झाडांना हटविण्यात आले. मात्र ह्या रस्त्यात रुंदीकरनाचे व छोठ्या मोठया पुलाचे संथगतीने सुरू असलेले बांधकाम हेही तेवढेच कारणीभूत ठरत आहे. या रस्त्यातील पुलाच्या ड्रायव्हेसन मजबूत तयार केला नसल्याने येथिल रपटाही या दरम्यान खरडून वाहून गेला असल्याने. पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून हे प्रत्यय या ठिकाणी लागू होत आहे. सुदैवाने ही वेळ दिवसाची असल्याने मार्ग निघू शकला नाहीतर काय हाल झाले असते याची कल्पनाही करणे अंगाला थरकाप करणारी ठरत आहे. यादरम्यान पुणे, अकोला, नांदेड, पुसद या लांब पल्ल्याच्या वाहनासह प्रवासी अडकून पडले होते. त्यावेळेस या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या व पुलाच्या बेजबाबदारने जो संथगतीने काम सुरू आहे यात पुर्णतः संबधित कंत्राटदारच जबाबदार असल्याचे अडकलेल्या लोकांनकडून रोष व्यक्त करतांना ऐकावयास मिळत होते. जेमतेम पाऊसस सुरुवात झाली असताना हे हाल आहेत तर पुढे काय स्थिती निर्माण होईल. त्यामुळे या महामार्गावरील गांभिर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्याने लक्ष घालून हा रस्ता तातडीने पूर्णत्वास न्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.



