Home यवतमाळ अट्टल दुचाकी चोरट्यांच्या टोळीला केले गजाआड

अट्टल दुचाकी चोरट्यांच्या टोळीला केले गजाआड

11

———————————————
१४ दुचाकी जप्त, साखरा येथून चौघांना ताब्यात
——————————————–
पांढरकवडा पोलिसांची कारवाई
घाटंजी- अट्टल दुचाकी चोरट्यांनी टोळी पोलिसांनी ताब्यात घेवून १४ वेगवेगळ्या दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी १२ जून रोजी पांढरकवडा पोलिसांनी पार पाडली असून, घाटंजी तालुक्यातील साखरा येथील सागर भेंटारे वय २३ वर्ष, विजय दडाजे वय २३ वर्ष, सुनील जाधव आणि विजय ढोले वय २६ वर्ष या चौघांना ताब्यात घेतले. पांढरकवडा शहरासह तालुक्यात आणि जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. त्यामूळे या चोरट्यांची शोधमोहीम पोलिस प्रशासनाने सुरू केली होती. अशात पांढरकवडा तालुक्यातील चोरीला गेलेल्या दुचाकी घाटंजी तालुक्यातील तरूणांच्या टोळीने लंपास केल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक पथक तयार करीत घाटंजी तालुक्यातील साखरा हे गाव शनिवारी गाठत सापळा रचला. यावेळी पोलिसांनी संशयित सागर भेंटारे, विजय दडाजे, सुनील जाधव आणि विजय ढोले आदी चौघांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू केली. प्रथम या चौघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर बाजीरावचा हिसका दाखवताच त्या चौघांनी एक नव्हे तर १४ वेगवेगळ्या दुचाकी लंपास केल्याची कबूली देत त्या विक्री केल्याचेही सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्या संपूर्ण १४ ही दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पांढरकवडा पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार प्रकाश क्षीरसागर आणि डीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

Copyright ©