Home यवतमाळ गोंदिया जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या मुले-मुली यांना पुढील शिक्षणासाठी भारतीय जैन...

गोंदिया जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या मुले-मुली यांना पुढील शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेकडुन पुढाकार घेण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी राजेश खेवले यांनी केली विनंती

9

 

बळीराजा चेतना अभियान यवतमाळ जिल्हा व जिल्हा प्रशासन तसेच भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नातून दि.१४ जून, २०१६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील ६० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना ५ वी ते १० वी पर्यंत पुढील शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या वाघोली येथील उपक्रमात पाठवून यवतमाळ जिल्हा प्रशासनाला अनमोल सहकार्य केले आहे.त्याच्या स्मृती अजूनही यवतमाळ जिल्ह्याचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खेवले यांच्या मनात ताज्या आहे.याच प्रमाणे जिल्हाधिकारी गोंदिया राजेश खेवले यांनी भारतीय जैन संघटनेचे माजी विदर्भ अध्यक्ष तथा प्रकल्प अधिकारी विजयकुमार बुंदेला यांना अभिनंदन पत्र पाठवुन पुढाकार घेण्यासाठी विनंती करण्यात आली कि गोंदिया जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे मुले-मुली यांना पुढील शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घ्यावा असे गोंदिया जिल्हाधिकारी राजेश खेवले यांनी सुचविले.तसेच भारतीय जैन संघटनेने यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याच्या उपक्रमात प्रकल्प अधिकारी म्हणून बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल विजयकुमार बुंदेला यांचे हार्दिक अभिनंदन सुध्दा केले.तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे मुले-मुली यांना पुढील शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा हि विनंती केली.भारतीय नारी रक्षा संघटना या उपक्रमात सहभागी होऊन तन मन धनाने सहकार्य करण्यास तयार आहे.तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला यांचे गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खेवले यांनी अभिनंदन केले.

Copyright ©