Home यवतमाळ उपसरपंचाने केलाआशा वर्कर वर सत्तुरने हमला.

उपसरपंचाने केलाआशा वर्कर वर सत्तुरने हमला.

11

दोन आशा वर्कर गंभीर जखमी

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील सायतखर्डा येथे आशा वर्कर गंगा मारोती कुमरे व कालींदा राजेश डहाके ह्या दोघी दिनांक ७ जून ला च चार वाजेच्या दरम्यान सायतखर्डा गावात दवाखान्याच्या कामानिमित्त गावात जात असता सायतखर्डा येथिल उपसरपंच मधुसूदन संभाजी मोहुरले यांने भर रस्त्यावर कांलीदा डहाके हीच्या डोक्यावर मागच्या बाजूने येवून सत्तुरने पहीला वार करून तीला रक्ताच्या थारोळ्यात‌ लोळविले आणी दुसरा वार गंगा कुमरे हीच्यावर केला असता गंगा ने तो वार हातावर झेलुन प्रतिकार केला यात कालीदा च्या डोक्यालावर मोठा मार लागला यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ यवतमाळ ला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे तर गंगा च्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सदर सरपंच मधुसूदन हा दोन्ही आशा वर्कर्सनां नेहमीच दमदाटी करून गेल्या आठ दीवसा पासून पाठलाग करीत असल्याची तक्रारीत म्हटले आहे. यावरून पारवा पोलिसात गंभीर गुन्हे दाखल करून आरोपीं मधुसूदन मोहुर्ले यास पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पारवा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोरख चौधर यासह सहाय्यक फौजदार रामकृष्ण चौके यांनी केली आहे. पुढील तपास वणी उपविभागीय पोलिस अधिकारी पुल्लजवार प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा हे करीत आहे. आरोपींने अचानक हमला का? केला याचे काही कारण अजूनही समजु शकले नाही.

Copyright ©