Home यवतमाळ गरजवंतांना जीवनावश्यक किट चे वाटप, व संगम घाटाची पाहणी

गरजवंतांना जीवनावश्यक किट चे वाटप, व संगम घाटाची पाहणी

33

उत्पनातील घाट्यातून गरजवंतांच्या ओठांवर हास्य फुलविण्याच्या आनंदाची निर्मिती

तालुक्यातील संगम येथील 42 कुटुंबाना जीवनावश्यक किट चे वाटप व भविष्यात राळेगाव शहराकरीता संगम येथून पाणी पुरवठा करण्या करीता पाहणी असा दुहेरी स्त्युत्य उपक्रम षट्र्पती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेकदिनाचे औचित्य साधून घेण्यात आला. न. प. मुख्याधिकारी अरुण मोकळ, डॉ. कुणाल भोयर, आसरा संघटन चे अध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, प्रकाश खुडसंगे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. . संगम येथील 42 कुटुंबाना यातून जीवनावश्यक किट चे वाटप करण्यात आले.
ग्रा. प. सदस्य अक्षय काळे यांनी दीड एकर क्षेत्रात मुंगफली ची लावणं उन्हाळ्यात केली. याला 55 हजाराचा खर्च आला. मात्र व्हायरस मुळे उत्पादनात घट आली. केवळ 10 हजाराचे उत्पन्न हाती आले. लावलेला खर्च देखील निघाला नाही. आलेला घाटा बघून दुःखी होण्यापेक्षा या घाट्याच्या रकमेतून गरजुंना मदत करावी व निदान त्यांच्या चेहऱ्यावर तरी आनंद निर्माण करावा या हेतूने सम्पूर्ण गावातील कुटुंबाला जीवनावश्यक किट चे वाटप करण्याचा विचार त्यांनी केला. याला सदहृदय मुख्याधिकारी अरुण मोकळ, डॉ. कुणाल भोयर, शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी समर्थ साथ दिली. यातून सम्पूर्ण गावाला साखर, तेलं व जीवनावश्यक किट चे वाटप शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
याच वेळी संगम येथील वर्धा नदीच्या घाटाची पाहणी देखील करण्यात आली. भविष्यात राळेगाव शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता संगम येथील घाट सर्वार्थाने योग्य राहू शकतो. राळेगाव पासून अंतर कमी, बारमाही पाणी, असल्याने येथून पाइपलाईन टाकल्यास राळेगाव शहराचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघू शकतो. सोबतच संगम, बोरी मेंघांपुर ही गावे देखील प्रकाश झोतात येऊन विकासाचा प्रवाह या गावाकरिता गतिमान होऊ शकतो. या दृष्टीने या घाटाची पाहणी न. प. मुख्याधिकारी व मान्यवरांनी केली.

प्रतिक्रिया
————-
1)” बी. एस्सी. ची डिग्री प्राप्त झाल्यावर अगदी ठरवून शेती करण्याचा निर्णय घेतला. शासनाचे धोरणं योग्य असले तर फायद्याची शेती नक्कीच होऊ शकते. बारमाही ओलित, बांधा पर्यंत शेत रस्ते व योग्य बाजारभाव या तीन गोष्टी प्राधान्य|ने केल्या तर देशाला समृद्ध करण्याची ताकत शेतकर्यांमध्ये आहे. मुंगफलीत घाटा आला त्यातूनही आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.दातृत्व व आशावाद या गोष्टी महत्वाच्या आहेत. मातीत राबतांना त्या आपोआपच आत झिरपत जातात दृढ होतात. संगम येथून राळेगाव शहराला पाणीपुरवठा पाइपलाईन टाकावी ही मागणी आहे. न. प. मुख्याधिकारी यांनी सकारत्मकता दाखवली पुढे बघू.
– *अक्षय काळे*
ग्रा. प. सदस्य, मेंघांपुर

2) ” राळेगाव शहराची लोकसंख्या गेल्या दशकभरात वाढली आहे. भविष्यात पाइपलाईन टाकायची असल्यास संगम येथील घाट उत्तम पर्याय होऊ शकतो. अंतर देखील कमी आहे. पाण्याची उपलब्धता देखील या ठिकाणी आहे. आज या उपक्रमाच्या निमित्ताने गरजूनागरिकांना काही अंशी मदत झाली याचा आनंद वाटतो.
– *अरुण मोकळ*
मुख्याधिकारी न.प. राळेगाव

3) ” विकासाच्या मुख्य प्रवाहात ही गावं आली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. विभागाचे आमदार मा. प्रा. डॉ. अशोकभाऊ उईके सर यांच्या माध्यमातून आपण विविध योजनांना गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. संगम येथून नवीन पाइपलाईन झाल्यास राळेगाव शहराला मोठा फायदा होईल, सोबतच या गावांनाही विकासाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळेल. आम्ही निश्चितच प्रयत्न करू.
– डॉ. कुणाल भोयर
भाजपा शहर अद्यक्ष, राळेगाव

4) ” कोरोना काळात अनेक गोरगरीब नागरिकांना त्रास झाला. आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. आज गरजवंत नागरिकांना मदत केल्याने आनंद झाला आहे. अक्षय काळे यांनी पुढाकार घेतला. राळेगाव येथे संगम येथून पाणीपुरवठा व्हावा या करीता नक्की प्रयत्न करू. चांगल्या कामाला आसरा संघटन ने नेहमीच सहकार्य केले आहे.
– शशिकांत उर्फ बाळू धुमाळ
अध्यक्ष आसरा सामाजिक संघटन, राळेगाव

Copyright ©