जिल्हाधिकारी अमोल येडगे हे पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांच्यावर कारवाई करतील की पाठराखिन करेल ?
29 मे रोजी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी चंदेल यांनी सात रोग आपत्ती व्यवस्थापन कायदा 1897 महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या कायद्याचे उल्लंघन केले होते .विनापरवानगी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त निरोप समारंभाचा कार्यक्रम असल्याकारणाने प्रशासनाच्या आदेशाला पायदळी तुडवत सत्कार समारंभ मोठ्या थाटात मॉनिटर क्लब दिग्रस येथे संपन्न केला. कोरोना कोव्हीड साथ रोगाचे नियमांना सुद्धा तिलांजली देत हरताळ भाजली. व लाॅकडाऊन मध्ये व 188 कलम लागू असतांना पण गर्दीचा मोठा जमाव करून कडक संचारबंदी चे उल्लंघन केल्यामुळे दिग्रस पोलीस स्टेशनने आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र आपल्या कुटुंबामधील पोलिस प्रशासन खात्यात कर्तव्यावर कर्तव्य पार पाडत असताना तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा ,1897, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या कायद्याचे 29 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याकारणाने शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनचा कायदा पायदळी तुडवून निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. असे असताना देखील व अनेक यूट्यूब चैनल, टीव्ही चॅनल, प्रसार माध्यम वृत्तपत्रा मध्ये मागील आठ दिवसापासून सेवा निवृत्त पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल यांच्या पराक्रमाचा गाजावाजा होत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही यावर पोलीस प्रशासन करीत नाही. अशा अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालून महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाची प्रतिमा कुठेतरी मलिन होताना यावरून दिसून येत आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणजे आपला बाबू होय आणि लोकांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे कार्ट होय अशी तटस्थ भूमिका पोलीस प्रशासन मुख्य आरोपीला वाचवत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये चर्चा होत आहे. सदर मॉनिटर क्लब दिग्रस येथे सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल यांची तक्रार सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, विद्यमान अमोल येडगे जिल्हाधिकारी, यवतमाळ व पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार सुद्धा देण्यात आली आहे . पोलीस अधिकारी यांच्या नावाची तक्रार करून सुद्धा कार्यवाही होताना दिसून येत नाही यावरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दाखल घ्यावी अशी मागणी केल्या जाताहेत आपत्ती व्यवस्थापन कायदा 1897 महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या कायद्याचे जो कोणी उल्लंघन करेल त्यांच्यावर रीतसर कार्यवाही केली पाहिजे पण तसे होताना कुठे दिसून येत नाही. पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होण्या अगोदरच पोलीस अधिकारी यांच्यावर उचित कार्यवाही करावी अशी मागणी जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत आहे*
