Home यवतमाळ प्रा. डॉ. माणिकराव ठिकरे काळाच्या पडद्याआड – मारेगाव तालुक्यात शोककळा

प्रा. डॉ. माणिकराव ठिकरे काळाच्या पडद्याआड – मारेगाव तालुक्यात शोककळा

32

 

नागेश रायपुरे, मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष तथा तसेच भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते पत्रकार प्रा. डॉ.माणिकराव ठिकरे सर (52) मारेगाव यांचे 4 जुनच्या रात्री 9 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने नागपूर येथे उपचार दरम्यान दुःखद निधन झाले. शहरातील एक सच्चा समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेल्याने अवघ्या तालुक्यात शोककळा पसरली आहे.

प्रा. डॉ.माणिकराव ठिकरे हे कला वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे प्राध्यापक होते तसेच मुक्त विधापिट मारेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होते.ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहायचे.नागरिकांच्या कोणतीही समस्यासाठी ते धावुन जायचे.ते स्वभावाने मनमिळाऊ असल्याने त्यांचे लाखो चाहता वर्ग आहे.

ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले.सामाजिक,राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केल्याने ते अनेकांच्या मनात घर करून बसले.

मात्र त्यांना 4 जुन च्या रात्री अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले होते.मात्र नियतीला मान्य नसल्याने त्यांचा उपचार दरम्यान निधन झाले.या घटनामुळे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रातील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.यांचे मागे पत्नी,1 मुलगा 1 मुलगी मोठा आप्तपरिवार आहे.5 जुन रोजी दु.1.30 वाजता चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील सावरगावं येथे यांचे मुळ गावात अंत्य विधी करण्यात आली.

Copyright ©