Home यवतमाळ शिस्तीच्या अधिकाऱ्याने बे शिस्तीत निरोप घेतल्याने सोशल मीडियावर खळबळ

शिस्तीच्या अधिकाऱ्याने बे शिस्तीत निरोप घेतल्याने सोशल मीडियावर खळबळ

10

 

लॉक डाऊन काळात निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला परवानगी कोणाची?

दिग्रस

दिग्रस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार उदयसिह चंदेल ठाणेदार पदावरून उपविभागीय पोलिस अधिकारी पदी वर्णी लागून वर्ष दीड वर्षाचा कालावधी संपला तसेच त्यांच्या नोकरीचा कार्यकाळ 31 मे रोजी संपल्याने त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये निवृत तारखेच्या अगोदर आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षीपासून कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे याही वर्षी सुद्धा कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाने डोके वर काढले असतां तसेच यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका हा सोळा तालुक्यांमध्ये वाढत्या कोरोना बाधित रुग्ना मुळे हॉटस्पॉट तालुका म्हणून दिग्रस तालुक्याची गणना झालेली असताना.तसेच हे अधिकारी कर्तव्यावर रुजू असताना शिस्तीचे धडे देणाऱ्या अधिकाऱ्याला हि मात्र स्वतःच्या निवृत्तीचा निरोप घेताना शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे कुठलेही भान न ठेवता आयोजकांच्या विनंतीला मान की थेट परवानगी देऊन सर्व नियम धाब्यावर बसवून आपला स्वतःचा निरोप समारंभ करून घेण्यात धन्यता मानल्यामुळे. या संपूर्ण बाबीची सोशल मीडियावर नाना प्रकारची चर्चा रंगली. एकीकडे कायद्याचे रक्षक म्हणून कर्तव्यावर रुजू असताना या निरोप समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली.एवढेच नव्हे तर सर्व नियम धाब्यावर बसवून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित तसेच कोणत्याही व्यक्तीला मास आढळून आले नाही. त्यामुळे सामान्य नागरिका विना मास्क किंवा बंदच्या काळामध्ये त्यांच्या कडून काही चुका आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो.तसेच कायद्याचे रक्षक कर्तव्यावर असताना नियम तोडून पोलीस विभागाचे लक्तरे उडवीत शिस्तीचे अधिकारी म्हनवून घेत संचार बंदी च्या काळातही बेकायदेशीरपणे एकत्र येऊन शासकीय सेवेतून निवृत्त होण्याचा कार्यक्रम कोरोनाचे निर्बंध तसेच सर्व नियम धाब्यावर बसवून घेण्यात आल्याने. दिग्रस शहरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांवर कारवाई केल्या जाते त्याच प्रमाणे त्यांच्यावरही बेशिस्तपणा ची कार्यवाही पोलीस अधीक्षक करणार काय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे

Copyright ©