Home यवतमाळ शेतीशी संबंधित दुकाने व सेवांच्या वेळेत बदल सकाळी 7 ते संध्या 7...

शेतीशी संबंधित दुकाने व सेवांच्या वेळेत बदल सकाळी 7 ते संध्या 7 पर्यंत राहणार सुरू

11

 

यवतमाळ दि 2 जून :- 2 जून पासून ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात कृषिशी संबंधित दुकाने आणि सेवा सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र सध्या शेतीचा हंगाम सुरू होत असून शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेतीशी संबंधित इतर साहित्य मिळण्यास बाधा उत्पन्न होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषिशी संबंधित सेवा आणि दुकानांच्या वेळेत बदल केला आहे. आता ही दुकाने सकाळी 7 वाजता पासून संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत.

कृषीशी संबंधित या सेवाना राहणार मुभा

१. सर्व प्रकारची कृषि सेवा केंद्रे , बि-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र, ठिबक सिंचन, तुषार सिंचन विक्री
दुकाने, कृषि साहित्य व कृषि अवजारे इत्यादीची दुकाने यापुढे सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. सदरील कालावधीत दुकानातील विक्री सोबतच शेतक-यांना व्हॉटसअॅप/मोबाईल कॉल व्दारे माहिती घेऊन कृषि निवीष्ठा होम डिलेव्हरी (घरपोच विक्री) करण्याच्या अनुषंगाने सदर कृषि निविष्ठा विक्री केंद्रांनी कार्यवाही करावी. जेणेकरुन शेतक-यांच्या सोयीनुसार तसेच गर्दी टाळून कृषि निविष्ठा विक्री करता येईल. तसेच कृषि निविष्ठा विक्री केंद्रावर कोविड त्रिसुत्रींचे पालन करणे, तसेच सदर कृषि निविष्ठा होम डिलिव्हरी व्दारे विक्री करणे यामध्ये जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी कार्यालयामार्फत तालुका कृषि अधिकारी (राज्य तसेच जि.प.) यांच्याकडून नियोजन करुन घ्यावे व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Copyright ©