—————————————-
१५० नागरिकांची तपासणी
—————————————-
तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात रुग्ण संकेत वाढ होत आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या मनात भीती पसरलेली आहे की कोरोना चाचणी केली तर पॉझिटिव्ह निघताना व कोविडं सेंटरमध्ये जावे लागणार. या भीतीने ग्रामीण भागातील लोकांमधील चाचणी करण्यासाठी टाळाटाळ करीत असून त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांत भर पडत आहे. योग्य वेळी तपासणी करून घेतली तर कुठेतरी ही कोरोनाची साखळी तुटणार यासाठी घाटंजी तालुक्यातील तहसीलदार पूजा मातोडे व आरोग्य विभागाच्या साह्याने तालुकाप्रशासन योग्य नियोजन करीत असून गावागावांत तपासणीची सुरुवात केली आहे.
चोरांबा गावातील शिबिरात आरोग्य विभागाचे तपासणी टीम कडून १५० लोकांची तपासणी करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार होटे साहेब, मंडळ अधिकारी फुलमाळी, शिबिरात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे यासाठी सरपंच सरपंच सौ.चंद्रकला शिरभते,सचिव मालखेडे, उपसरपंच संदीप खवास, जयराम तोडसाम,राजुभाऊ शिंगाडे ,ज्योतिताई रंदई, कांचन उरकुडे, अनघा पाटील, आशा सेविका लताताई कलांद्रे, पोलीस पाटील रवींद्र मेश्राम, बंडूभाऊ तोडसाम,
यांच्या सहकार्य मुळे शिबिर यशस्वी झाले..
