तालुक्यातील मनपुर येथे अति मद्य प्राशन करून विहिरीच्या काठावर बसतांना तोल जाऊन विहिरीत पडून मरण पावल्याची घटना उघडकीस आली .
मृतकाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार १ तारखेला अजय सलाम वय २१ वर्ष हा दिवसभर दारू पिऊन गावात फिरत होता रात्री ७ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत विहिरीच्या ओट्यावर बसण्याचा प्रयत्न करीत असताना तोल जाऊन विहिरीत पडला रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र विहीर जास्त खोल असल्याने मृतकाचा थांगपत्ता लागला नाही दोन तारखेला पोलिसांच्या मदतीने १० वाजताच्या सुमारास लोखंडी गाळाने मृतकाला बाहेर काढण्यात आले अजय चंदू सलाम वय २१ वर्ष असे मृतक तरुणाचे नाव आहे.
