झाडगाव येथुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या झरगड गावाचा रस्ता संपूर्ण उखरून गिट्टी उघडी पडली असल्याने संपूर्ण रोड खराब झाला या रस्त्यावरुन मोठे वाहन तर सोडाच पण पायदळ चालावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या रस्त्यावरुन चालतांना मोठी संमश्या निर्माण झाली असल्याने स्थानिक संबंधित पदाधिकाऱ्यांन विषयी ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होताना दिसुन येत आहे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या झाडगाव ते झरगड रोडवर मोठ मोठे खड्डे पडले गिट्टी उघडी पडली असुन कोणत्याही प्रकारची आजपर्यंत या रस्त्याची डागडुजी सुध्दा करण्यात आली नाही त्यामुळे गिट्टी उघडी असल्याने सामोरुन येणाऱ्या वाहनाला साईट देतांना अनेक दा छोटे मोठे अपघात सुध्दा होत आहे वाहन चालवतांना जनु काही या रस्त्याने
तारेवची कसरत करावी लागत असल्याने गावकऱ्यांनी मात्र आता या भागाच्या लोकप्रतिनिधीना आर्त हाक देत आमच्या गावाचा रस्ता कधी होईल हो साहेब असे मणत आज दुसरी पंचवार्षिक आली पण हा रोड मात्र होतांना दिसुन येत नाही या रस्त्या बाबत अनेक दा निवेदन दिले तक्रारी केल्या स्थानिक नेते या रस्त्याने रोज ये जा करतात गावात खांद्यावर टावेल टाकुन मिरवतात आमदार साहेब आले की पुडे पुडे करतात पण त्यांना हा रस्ता का दिसत नाही असा प्रश्न गावकरी करतांना दिसुन येते त्यामुळे आता लोकप्रतिनिधीन विषयी गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे निवडणुका आल्या की खोटे आश्वासन गावकऱ्यांना देतात असे दुसरी पंचवार्षिक आली पण रोड मात्र झाला नाही त्यामुळे गावकरी या रोड करिता ग्रामपंचायत सामोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनातून इशारा देण्यात आला आहे तरी संबधीत बाधंकाम अधिकारी यांनी हा रस्ता त्वरीत दूरस्थ करावा अशी मागणी करण्यात येत आहे
