Home महाराष्ट्र अँटीलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझेंचा सहकारी एपीआय काझी सरकारी साक्षीदार, एनआयएची विशेष...

अँटीलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझेंचा सहकारी एपीआय काझी सरकारी साक्षीदार, एनआयएची विशेष कोर्टात माहिती

14

मुंबई प्रतिनिधी : सचिन वाझे यांच्या पायाखालची जमीन दिवसेंदिवस कमी होत चाललीय. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं सचिन वाझेंविरोधात युएपीए म्हणजेच ‘प्रिव्हेंशन ऑफ अनलॉफूल एक्टिव्हीटीज’ या कलमाखाली आरोप लावत असल्याचं बुधवारी कोर्टाला सांगितलं. टाडा, पोट्टा यांसारखी कायदे रद्द करून युएपीएची निर्मिती करण्यात आलीय. साधारणत: दहशतवाद्यांविरोधात लावली जातात. ज्यात दहशातवादी कारवाया करून देशाविरोधात युद्ध पुकारणे, स्फोटकांचा वापर अश्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. याशिवाय वाझेंचा सहकारी रियाझ काझी जो सुरूवातीपासूनच तपासयंत्रणेच्या रडारवर होता. तो आता सरकारी साक्षीदार बनण्यास तयार असल्याचं एनआयएनं कोर्टाला कळवलंय. त्यामुळे या संपूर्ण कटाची आखणी, उद्देश याबाबतचे भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागल्याचं स्पष्ट आहे. मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रात रियाझ काझी यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करत नवी नियुक्ती शस्त्रास्त्र विभागात करण्यात आली आहे.

Copyright ©