Home यवतमाळ *आपदा प्रतिक्रिया बल तहसीलदार यांचे कडून सन्मानित*

*आपदा प्रतिक्रिया बल तहसीलदार यांचे कडून सन्मानित*

14

 

 

*19 _(कोरोना) महामारी मध्ये निराश्रित व निराधारांना TDRF जवानांनी जेवणाची व्यवस्था करून दिला आधार*

– एस.पी.मुळे,तहसिलदार दारव्हा

दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी तालुक्यात Covid-19 मध्ये सतत कार्यरत असणाऱ्या TDRF आपदा प्रतिक्रिया बल दारव्हा (कोव्हीड योद्ध्यांचा) मा. तहसीलदार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

कोरोणा महामारी सोबत लढा देत असताना सरकार द्वारे घोषित संचार बंदी मध्ये अनेक लोक तालुक्यात अडकले होते. अशातच शहरी व ग्रामीण भागातील निराधार, निराश्रित, दिव्यांग व मनोरुग्ण नागरिक यांना TDRF च्या वतीने तालुक्यातील दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. एवढेच नाही तर गावागावांमध्ये जाऊन कोरोना विषाणू संबंधी जनजागृती केली व जे लोक मास्क घेऊ शकत नव्हते अशा सर्वांना स्वतः मास्क शिवून सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच संचारबंदी मध्ये सतत कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना चहा, नाश्ता देऊन मदत केली. असे सर्व सेवा कार्य संचालक हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनात जवानांनी केली. संपूर्ण सेवाकार्य जवानांनी नि:शुल्क केले. यांच्या सेवा कार्याची दखल घेत तहसीलदार दारव्हा मा.एस.पी.मुळे यांच्या हस्ते TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस,उपविभागीय क्षेत्रीय अधिकारी प्रितेश कराळे,कंपणी कमांडर महादेव गजभार,सहा.कंपणी कमांडर योगेश्वर देवकर,रणजीत चव्हाण,अल्का वहाने,आरती इंगोले,वैभव भोजपुरे,दानिश शेख,पायल कन्हेरकर इत्यादी सर्व आपदा प्रतिक्रिया बल दारव्हा अधिकारी व जवानांचा सेवाकार्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तहसील चे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

Copyright ©