Home यवतमाळ चिखलवर्धा ते सायफळ रोडवर संत्रा भरून नेणार्या आयशर चा भिषण अपघात*

चिखलवर्धा ते सायफळ रोडवर संत्रा भरून नेणार्या आयशर चा भिषण अपघात*

11

 

*रोडची साईड पट्टी भरून नसल्यानेच अनेक झालेअपघात*

 

सार्वजनिक बांधकाम विभाग घाटंजी चे दुर्लक्ष

 

घाटंजी:तालुक्यातील चिखलवर्धा ते सायफळ रोडवर असलेल्या अहील्यानगर येथे अमरावती हून हैदराबाद कडे जाणाऱ्या आयशर क्रमांक एम एच २७ एक्स ८४३८ या वाहणाचे सकाळच्या सुमारास रोडची साईड पट्टी भरून नसल्याने अपघात झाला सदर वाहन चालकाने समोरून येणाऱ्या वाहणाला साईड देण्यासाठी गाडी खाली उतरवीले मात्र रोडची साईड पट्टी भरून नसल्याने सदर वाहनाची तोल न सांभाळल्याने वाहन पलटी झाले. चिखलवर्धा ते सायफळ रोड हा तेलंगणा राज्य व महाराष्ट्र राज्यातील श्री क्षेत्र माहूर गड श्री क्षेत्र उनकेश्वर येथे जोडत असल्याने विदर्भातील अनेक पर्यटक या रस्त्याने जात असतात दिवसभरात एसटी बस चे सुध्दा ३० ते ४० पेर्या होतात हा अंत्यत वाहनाच्या वर्दळीचा रस्ता असल्याने मात्र रस्ता सिंगल असल्याने अपघात सुरूच राहतात तात्काळ रस्ता चे रूंदीकरण करावे व साईड पट्टी भरावे अशी मागणी चिखलवर्धा सायफळ परीसरातील वाहन चालकांनी केली आहे.

Copyright ©