Home यवतमाळ जवळा येथे आरोग्य तपासणी संपन्न

जवळा येथे आरोग्य तपासणी संपन्न

58

जवळा येथे आरोग्य तपासणी संपन्न

गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळा मधील सर्व विद्यार्थ्यां चीआरोग्य तपासणी सत्तुरवार चिल्ड्रेन हॉस्पिटल आर्णी च्या वतीने करण्यात आली

जवळा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी डॉक्टर स्वप्नील सत्तुरवार यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्राध्यापक प्रेम राठोड यांच्या वाढदिवसा कारणे सदर आरोग्य तपासणी आयोजित होती या आरोग्य तपासणीमध्ये 69 विद्यार्थ्यांचे तपासणी करण्यात आली सोबतच त्यांना आरोग्य शिक्षणाची माहिती दिल्या गेली कार्यक्रमादरम्यान प्रा.प्रेम राठोड राजूभाऊ इंगोले आर्णी ओंकार चेके हरीश भाऊ निला पवार डॉक्टर स्वप्निल सत्तरवार यांचा सत्कार करण्यात आला

सदर आरोग्य तपासणी मध्ये विद्यार्थ्यांना मोफत औषधाचे वाटप करण्यात आले या आरोग्य तपासणी मध्ये पावसाळ्यात कोणत्या रोग राहिला आपण प्रतिबंध करू शकतो याची माहिती दिल्या गेली

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्याच्या डॉक्टर सत्तुरवार यांच्या या उपक्रमाबद्दल प्रा.प्रेम राठोड यांनी कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुल इंग्लिश स्कूल येथील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Copyright ©