Home यवतमाळ स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी यवतमाळच्या विद्यार्थ्यांचे सुयश

स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी यवतमाळच्या विद्यार्थ्यांचे सुयश

71

स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी यवतमाळच्या विद्यार्थ्यांचे सुयश

स्टेअर्स महाराष्ट्र राज्य स्पर्धेमध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी, यवतमाळ येथील खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन राहिले. स्टेअर्स स्टेट युथ गेम्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धे मध्ये कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी, यवतमाळ येथील ४ खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन दाखऊन यवतमाळची मान उंचावर नेली. तसेच आपल्या प्रशिक्षकासोबत आई-वडिलांचा स्वाभिमान वाढविला.

हि स्पर्धा स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफियर्स अँड स्पोर्ट्स यांच्या विद्यमाने घेण्यात आली.

१० वर्षे, ३० किलो वजन गटामध्ये त्रिशा मंटू प्रसाद हिने कुमित्ते मध्ये सुवर्ण पदक व काता मध्ये कास्य पदक, १२ वर्षे, ३० किलो वजन गटामध्ये रिद्धी मंटू प्रसाद हिने कुमित्ते मध्ये सुवर्ण पदक व काता मध्ये कास्य पदक, १२ वर्षे, ५५ किलो वजन गटामध्ये आराध्या दीपक हो हिने कुमित्ते मध्ये सुवर्ण पदक व काता मध्ये कास्य पदक, १६ वर्षे, ६५ किलो वरील वजन गटामध्ये दिव्या दीपक हो हिने कुमित्ते मध्ये सुवर्ण पदक व काता मध्ये कास्य पदक प्राप्त केले.

 

हि स्पर्धा दि. ०८ व ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रिन प्याराडाईज रिसॉर्ट, विरार वेस्ट, मुंबई येथे घेण्यात आली होती, खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय स्काई इंटरनेशनल स्कूल चे संस्थापक श्री राजेंद्रजी डांगे सर, श्री यशवंत डांगे सर, मुख्याध्यापक सोमेन च्याटर्जी सर, मार्गदर्शक व प्रशिक्षक कराटे स्पोर्ट्स अकॅडेमी, यवतमाळ चे संथापक अध्यक्ष, स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा समिती तांत्रिक निर्देशक सेन्साई सुजित हरिभाऊ पत्रे व आई-वडिलांना दिले. विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह १६ फेब्रुवारी रविवार रोजी कराटे स्पोर्ट्स अकॅडमी, स्काई इंटरनॅशनल स्कूल, साने गुरुजी नगर, वाघापूर रॉड, लोहारा येथे होणार आहे.

Copyright ©