कु.वैष्णवी गोडळकर हिची तलवारबाजी स्पर्धेकरिता खेलो इंडियासाठी निवड
नगर – येथील लाल मातीच्या तालमीचे वस्ताद पै.तुकाराम गोडळकर यांची नात कु.वैष्णवी सुनील गोडळकर हिची जम्मू येथे झालेल्या ऑल इंडिया फेंसिंग (तलवारबाजी) चॅम्पियनशिप स्पर्धेतून खेलो इंडिया युनिर्व्हसिटी गेम, दिल्ली साठी निवड झाली.
विश्व हिन्दु महासंघाचे गोरक्षा विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार श्री मिलिंद चवंडके तसेच श्री गोविंदराव मिसाळ, श्री राजेंद्र भागानगरे, श्री बाळासाहेब दहिंडे यांनी कु.वैष्णवी हिच्या घरी जावून पुष्पगुच्छ देत कौतुक केले. आपल्या लिंगायत गवळी समाजाचे नाव उंचावण्याचे कार्य तुझ्याकडून घडले. खेलो इंडियासाठी खुप खूप शुभेच्छा, अशा शब्दात तिचे कौतुक करीत अभिनंदन करण्यात आले.
समाजबांधवांनी आपलेपणाने घरी येऊन केलेल्या या कौतुक सोहळ्याने तिचे वडील श्री.सुनील तुकाराम गोडळकर आणि आई सौ.सुनंदा सुनिल गोडळकर यांना खुप आनंद झाला. कु.वैष्णवी हिला प्रशिक्षक म्हणून वडिलांचेच मार्गदर्शन लाभते आहे. लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी या मर्दानी खेळाची लिंगायत गवळी समाजात परंपराच चालत आली आहे. वैष्णवीचे वडिल ही समाजातील परंपरा अभिमानाने आणि निष्ठेने जतन करत साबळे वाघिरे कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

