Home यवतमाळ गवळी समाज बांधवांचे पालकमंत्री यांना निवेदन

गवळी समाज बांधवांचे पालकमंत्री यांना निवेदन

40

गवळी समाज बांधवांचे पालकमंत्री यांना निवेदन

यवतमाळ येथे शुक्रवार, दिनांक ६.सप्टेंबर २४ रोजी दुपारी राज्याचे जलसंपदा मंत्री(कॅबिनेट) ना.श्री.संजयजी राठोड ह्यांची “गवळी समाज कृती समिती – महाराष्ट्र राज्य” च्या शिष्ट मंडळाने भेट घेवून महाराष्ट्र राज्यातील समस्त गवळी समाजातील सुशिक्षित बेरोजगार, होतकरू दुग्ध व्यवसाय करणारे,विद्यार्थी – विद्यार्थिनीं इत्यादींना आर्थिक, सामाजिक , सांस्कृतिक, शैक्षणिक विकास साधण्यासाठी स्वतंत्र असे”श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ”स्थापन करणेसाठी “गवळी समाज कृती समिती – महाराष्ट्र राज्य ” चे प्रदेश मुख्य संयोजक यांचे नेतृत्वात आणि मा.संजय भाऊ शिंदे (धनगर समाज नेते)तसेच सुरेंद्र काटे (मामा) यांचे पुढाकाराने मागण्यांचे निवेदन दिले…यावेळी माननीय मंत्रीमहोदय ह्यांनी प्रमुख मागणीस सहमती दर्शविली तसेच शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले,यावेळी शिष्टमंडळात सर्वश्री किसनराव डोळे,रामदासजी काटे,आनंदराव शेलार,अमोल झामरे,मनोहर चौकोने,डॉ.कोमल चौकोने तथा अन्य हजर होते

Copyright ©