यवतमाळ जिल्हा गवळी समाज संघटना तथा महानुभाव उपकसाक मंडळ यांच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन
दिनांक१८/०१/२०२४च्या शासन निर्णयानुसार दिनांक ०५/०९/२०२४रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन {जयंती }यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना, कार्यालये,शाळा, महाविद्यालये या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन प्रतिमा पूजन करून साजरा होण्याबाबत आदेश निर्गमित व्हावे याकरिता मा. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा अधिकारी यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत लगेच आदेश निर्गमित करतो असा विश्वास दिला.सदर निवेदन देण्यासाठी यवतमाळ जिल्हा गवळी समाज संघटना रंनं ५४९चे जिल्हा कार्याधक्ष अनिल भाऊ चावरे
यवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष .ओंकारजी चेके,संजय काळे, मोहन चावरे, गौरव पाने, चंद्रपाल कालोकार,अमोल घसाड, सुभाष कालोकार, अनिल येवले, अनिल झामरे, सुभाष काकडे,किशोर कालोकार,अविनाश येवले इत्यादी पंथसेवक उपस्थित होते तसेच महानुभाव पंथीय मंडळींनी हा सोहळा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करावा असेआवाहन करण्यात येत आहे.
