अर्शान सत्तार शेख याचा सत्कार
हीवरी येथील अर्शान सत्तार शेख हा विद्यार्थी एस आर पी मध्ये नुकतेच सिलेक्षण झाले
अर्शान सत्तार शेख यांच्या अपार परिश्रमास अखेर यश आले आणि एस आर पी मध्ये त्याची वर्णी लागली एकाच महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी गावाचे नाव लौकिक केले यांच्या हीवरी कराना अभिमान आहे, आर्शन याचे आई वडील अत्यंत सामान्य कुटुंबातील असून त्याला चांगले शिक्षण देण्याचीही परिस्थीती नसताना त्याची हि जिद्द चिकाटीने यश मिळाले त्याला मिळालेल्या यशाचे कौतुक येथील ग्रामपंचायत चे सदस्य सौ संध्याताई अतकरी,विठोबाची कोडापे, अनंत राऊत,संदीप खोडकुंभे,ओंकार चेके,इस्माईल शेख,मोहन गावंडे यांनी अर्शान शेख व आई वडील यांचा सन्मान केला.या तीनही विद्यार्थांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही आपले प्रयत्न सुरू केले त्यानाही लवकरच यश मिळेल अशा शुभेच्छा सदस्यांनी दिल्या.
