महिलांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून स्वयंसिद्धा व्हावे – सरपंचा सौ. वर्षाताई आडे
ग्रामपंचायत अंबोडा येथे नारी शक्ती अभियान
महिलांनी आपल्यातील कलागुणांचा आणि कौशल्याचा विकास करून आपल्या पायावर उभे होऊन अर्थार्जनासोबतच स्वतःचा सर्वांगिण विकास साधून स्वयंसिद्धा व्हावे असे प्रतिपादन ग्रामपंचायत अंबोडाच्या सरपंचा सौ वर्षाताई बा. आडे यांनी केले त्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत आंबोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी सन्मान सोहळ्यात बोलत होत्या.
त्यांनी पुढे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच हिंसा आणि धाकदपटशामुक्त वातावरणात त्यांना त्यांचे मन आणि शरीर या दोन्हींच्या बाबतीत मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी मिळणे या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. तसेच महिलांवरील काळजीचे ओझे कमी करणे आणि कौशल्य विकास, क्षमता निर्मिती, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्ज मिळण्यातील सुलभता इत्यादी बाबींना प्रोत्साहन देऊन महिला कामगार दलाचा सहभाग वाढविणे ही उद्दिष्टे देखील या योजनेच्या अंमलबजावणीतून साध्य करण्याकरिता हे नारी शक्ती अभियान राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंचा सौ. वर्षा बाबारावजी आडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक नंदकिशोर राऊत, ग्रामसेवक डॉ.विजयकुमार ठेंगेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. रेश्मा अरविंद राठोड, उपसरपंचा सौ.चंचला ज्ञा.पावडे, व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नारी शक्ती सन्मानाने सौ रेश्मा अरविंद राठोड, सौ मेघा शरद पाटील,, सौ. शीतल आडे, सौ. वैशाली राठोड, सौ. रेखा जाधव, सौ.पल्लवी चव्हाण अंगणवाडी सेविका लताबाई पाटील आशा वर्कर विश्रांतीबाई पाटील यांना गौरविण्यात आले.
तसेच यावेळी शाळेला टेबल व खुर्च्या भेट देणाऱ्या देणगीदात्या श्रीकांत राऊत व किशोर राठोड यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नंदकिशोर राऊत यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंकुश दा. मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अजय प्र. पाटील, ऍड. अतुल ऊ.राठोड, भीमराव ज.जाधव, सौ. करुणा या. चव्हाण, सौ. पल्लवी ज्ञा.चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नारी शक्ती सन्मानाने सौ रेश्मा अरविंद राठोड, सौ मेघा शरद पाटील,, सौ. शीतल आडे, सौ. वैशाली राठोड, सौ. रेखा जाधव, सौ.पल्लवी चव्हाण, सुभाष जाधव संजय डाखोरे यादव चव्हाण श्रीकांत राऊत किशोर राठोड यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव, संगणक परिचालक दिनेश पाटील, रोजगार सेवक कैलास राठोड, ज्येष्ठ नागरिक बाबाराव आडे, राजकमल पाटील, यादव राठोड, शिक्षक युनूस यु.मलनस, शमशुद्दीन श.भाटी, पुंडलीक राठोड, अरविंद राठोड, द्यानेश्वर जाधव, शरद पाटील, विनोद राठोड, संदेश राठोड यांचेसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
