Home यवतमाळ “यवतमाळ ची समीक्षा नागपूर विभागातून कृषी सेवक परीक्षेत (एनटी-सी)भज-क प्रवर्गातून दुसरी”

“यवतमाळ ची समीक्षा नागपूर विभागातून कृषी सेवक परीक्षेत (एनटी-सी)भज-क प्रवर्गातून दुसरी”

13

“यवतमाळ ची समीक्षा नागपूर विभागातून कृषी सेवक परीक्षेत (एनटी-सी)भज-क प्रवर्गातून दुसरी”

कृषी सेवक पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत नागपूर विभागातून १७२७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.सदरील परीक्षा ही (आयबीपीएस-टीसीएस) च्या माध्यमातून राज्यभरात दिनांक १६ ते १९ जानेवारी २०२४ दरम्यान घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल १२ मार्च रोजी जाहीर करण्यात आला.यामध्ये ‘कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था,यवतमाळ ची विद्यार्थी कृषिकन्या समीक्षा वसंतराव होडगीर हिने नागपूर विभागातून २३ व्या स्थानी व (एनटी-सी)भज-क प्रवर्गातून दुसऱ्या स्थानी येण्याचा मान पटकविला आहे.समीक्षा ने तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रा.पंढरी पाठे व आई -वडिलांना दिले आहे.समीक्षा ला मिळालेल्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Copyright ©