बोरी अरब येथील हेडकॉटर मिळालेल्या विकास कामांना अद्यापही गती नाहीं
2 कोटी 62 लाख रु. निधी बत्ती गुल
दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील तीन महिने लोटूनही अद्यापही कामा ला गती मिळाली नाही.
बोरी अरब येथील विकास कामांचा खेळ खंडोबा झाला असून तालु्यातील बोरी अरब गाव पिछाडीवर गेला आहे. विद्यमान यवतमाळ विधानसभा आमदार यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजन नंतर कामाच्या सुरुवात चा मुरहूर्त अद्यापही ठरला नाहीं. यवतमाळ विधानसभा अंतर्गत सर्वात मोठे शहर असून येथील विद्यमान आमदार यांच्या कडून दिशा भुल होत आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
बोरी अरब ग्राम पंचायत ने सुद्धा या वर अजूनही कोणतीच पाऊले उचली नसून काम मंद गती ने थंडवल आहे. बोरी अरब ग्राम पंचायत ठेकेदार कडून लोणी मिळेल का अशी वाट बघत आहे की काय अश्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
बोरी अरब मधील विकास कामे पुढील प्रमाणे असून एकूण 2 कोटी 62 लाख रु. आहे.
रमाई नगर मध्ये बुध्द स्मशानभुमीला चेनलिंक फेनसिंगचे बांधकाम करणे, किमंत ०३.०० लक्ष.
• रमाई नगर मध्ये पेव्हर ब्लॉक रस्ता व पोलवर लाईट बसविणे. किमंत ०६.०० लक्ष.
• भिमनगर मध्ये श्री. विनोद मेश्राम ते श्री. चंदकापुरे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे, किमंत ०६.०० लक्ष.
• समता नगर मध्ये श्री. विजय तायडे ते श्री. वासनिक यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे, किमंत ०६.०० लक्ष.
• राजीव नगर मध्ये श्री. श्रीरामे ते श्री. इंगळे ते श्री. इंगोले यांच्या घरापर्यतरस्त्याचे कॉक्रीटीकरण व पोलवर लाईट बसविणे. किमंत १०.०० लक्ष.
• वार्ड क्र. ५ मध्ये श्रीमती ताराबाई बन्सोड ते श्रीमती चंद्रकलाबाई रामटेके यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता, कॉक्रीट नाली व
पेव्हर ब्लॉक बसविने. किमंत १०.०० लक्ष. ”
• वार्ड क्र. ३ मध्ये डॉ. आंबेडकर पुतळ्या जवळ सौदर्गीकरण करणे, किमंत०५.०० लक्ष.
• वार्ड क्र. ४ मध्ये श्री. प्रकाश खंडारे ते सरकारी रस्त्यापर्यंत कॉक्रीट रस्ता, कॉक्रीट नाली व पेव्हर ब्लॉक बसविने. किमंत १५.०० लक्ष.
• वार्ड क्र. १, बुध्द स्मशानभुमी मध्ये रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे, किमंत ०५.०० लक्ष.
वार्ड क्र. ३ मध्ये डॉ. आंबेडकर पुतळा ते अंगणवाडी पर्यंत कॉक्रीट रस्ता, कॉक्रीट नाली व पेव्हर ब्लॉक बसविने.
किमंत १५.०० लक्ष.
• वार्ड क्र. ४ मध्ये श्री. कांबळे ते श्री. नागोराव भागत यांच्या घरापर्यंत कॉक्रीट रस्ता कॉक्रीट नाली व पेव्हर
• ब्लॉक बसविने. किमंत १०.०० लक्ष.
• राजीव नगर मध्ये अल्पसंख्याकाकरीता शादी खानाचे बांधकाम करणे, किमंत १५.०० लक्ष.
• अल्पसंख्याक कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक तसेच कब्रस्थानाचे
सौंदर्याकरण करणे. किमंत १५.०० लक्ष.
अश्या प्रकारे विकास कामांचा भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न झाला..
