Home यवतमाळ विद्युत वितरण कंपनी विरोधात सावळी सदोबा सोमवारी रास्ता रोको ! 

विद्युत वितरण कंपनी विरोधात सावळी सदोबा सोमवारी रास्ता रोको ! 

13

आशिफ खान प्रतिनिधी

विद्युत वितरण कंपनी विरोधात सावळी सदोबा सोमवारी रास्ता रोको ! 

सावळी सदोबा :- सावळी सदोबा परिसरामध्ये मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या विद्युत लपंडावामुळे शेतकरी वर्ग आणि विद्युत ग्राहक त्रस्त झाले असल्यामुळे दिनांक 24 ला या विभागाचे माजी जि प सदस्य तथा भाजपा आर्णी तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ राठोड यांच्या यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात येत आहे .

सावळी सदोबा विभागातील सर्व शेतकरी बांधवाच्या हाती आलेल्या पिकांना सद्यस्थितीत पाणी देणे आवश्यक असल्यामुळे या विभागांमध्ये मागील पंधरा दिवसापासून विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे ना हक त्रास होतो आहे

विभागामधील अनेक रोहित्रे नादुरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यासह विद्युत ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

वरील गंभीर विषयाबाबत अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्यानंतर ही शेतकऱ्यांना व विद्युत ग्राहकांना कसलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे माझी जि प सदस्य व आर्णी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शेतकरी आणि विद्युत ग्राहकासह दुपारी बारा वाजता सावळी सदोबा येथे रास्ता रोको करण्यात येत आहे

Copyright ©