नवशक्ती मंडळातर्फे बेटी बचाव आंदोलनाचे प्रमुख डॉक्टर गणेश राख यांचा सत्कार
यवतमाळ., शहरातील 52 वर्षापासून सुप्रसिद्ध असलेले नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ माळीपुरा गणपती मंदिर येथे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे प्रणेते पुणे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर गणेश राख यांचा यांचा नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले. कुंदन शर्मा शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमोदिया अनिल शर्मा मुरारीलाल झुनझुनवाला अरुण शर्मा अनिल कट्यारमल
कार्यक्रमांमध्ये विशेष अतिथी म्हणून डॉ. गणेश राख प्रणेते (बेटी बचाव जन आंदोलन) डॉ.प्रमोद लोहार डॉ. (राष्ट्रीय मार्गदर्शक )डॉ. लालासाहेब गायकवाड (संयोजक) डॉ. शिवदीप उंदरे (समन्वयक)डॉ.शंतनू जगदाळे (समन्वयक )सौ .राधिका सानप (समन्वयक )प्रामुख्याने उपस्थित होते प्रारंभी डॉक्टर गणेश राखे यांनी देवीचे वअखंड ज्योत चे दर्शन घेतले तसेच दररोज चालणाऱ्या कार्यक्रमाची पाहणी केली
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गणेश राख यांनी मुक्तकंठाने नवशक्ती मंडळाची प्रशंशा करून बेटी बचाव बेटी अभियानात यवतमाळकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा मुलगी झाल्यास नवरात्र उत्सवासारखा आनंद उत्सव साजरा करावा असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले तर डॉक्टर लालासाहेब गायकवाड यांनी बेटी बचाओ ची शपथ दिली याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढाव या घोषणेने परिसर दुमदुमले
