Home यवतमाळ बोरीसिंह येथील शेतकर्‍यांच्या शेतातील बावीस हजार रुपयाचे गेट चोरटय़ाने केले लंपास

बोरीसिंह येथील शेतकर्‍यांच्या शेतातील बावीस हजार रुपयाचे गेट चोरटय़ाने केले लंपास

14

प्रतिनिधी अकोला बाजार प्रवीण राठोड 

बोरीसिंह येथील शेतकर्‍यांच्या शेतातील बावीस हजार रुपयाचे गेट चोरटय़ाने केले लंपास

वडगाव जंगल पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरीसिह येथील शेतकरी प्रविण योगेश्वर गादेवार यांचे गावा शेजारीच शेत आहे. शेत सर्वे न.141 असलेल्या शेतात शेता भोवती तार कुंपण व 250 क्विंटल वजनी दोन गेट येण्या जाण्यासाठी लाऊन होते.

दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी हे दोन गेट लंपास केले.या गेटची किंमत अंदाजित 22000 रुपये असून या बाबतची तक्रार शेतकरी प्रविण गादेवार यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी वडगाव जंगल पोलिस स्टेशन गाठून अज्ञात चोरटय़ां विरुद्ध रीतसर तक्रार दिला,त्यावरून ठाणेदार संजीव खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भाऊराव बोकडे तपास करीत आहेत.

Copyright ©