Home यवतमाळ बाबासाहेब देशमुख विद्यालय येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी

बाबासाहेब देशमुख विद्यालय येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी

15

बाबासाहेब देशमुख विद्यालय येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी

श्री चक्रधर स्वामी जयंती

यांच्या जयंतीच्या औचित्य साधून विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक वाढोनकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या शिक्षिका कुमारी नेलावार, वायआर घोडे कुमारी मेश्राम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला महानुभाव पंथाचे प्रवर्तक,मराठी भाषेचे जनक भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष वाढोनकर यांच्या हस्ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली तसेच सर्व शिक्षक वृंदांनी प्रतिमेचे पूजन केले कुमारी नेलावार, यांनी चक्रधर स्वामी यांच्या तत्त्वज्ञानाविषयी व लीळाचरित्र या ग्रंथाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली तर अध्यक्षीय भाषणात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनाविषयी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाढोनकर यांनी सविस्तर माहिती दिली विद्यालयाच्या वर्ग नववीच्या विद्यार्थिनी कुमारी जरीन तिगाले भूमिका जाधव प्रणाली सावंत जन्नत चव्हाण इत्यादी विद्यार्थ्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या विषयी विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक वाय आर घोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निबुदे कार्यक्रमाच्या यशस्वी साठी पोलेवार बाबू अनंत वखरे यांनी मोलाचे सहकार्य केले

Copyright ©