Home यवतमाळ अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ दिग्रस येथे सकल मराठा समाजाचे रास्ता रोको...

अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ दिग्रस येथे सकल मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन

11

अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ दिग्रस येथे सकल मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन

तरुणांच्या मार्गदर्शनात निघाला भव्य मोर्चा

जालना जिल्ह्यातील एक छोटे गाव अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षनासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेकजन जखमी झाले मराठा समाज बांधवावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज दिनांक ४/९/२०२३ ला सकाळि १० वाजता सर्व मराठा समाज बांधव वडवाला जिनिंग येथे एकत्रित होउन या ठिकाणावरुन विविध नारे देत शहरातील मानोरा चौक येथे पोहचून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनात एक विशेष बाब म्हणजे रास्ता रोको आंदोलन करताना टायर जाळणे किंवा वाहने आडवी लावणे नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करणे असा कुठलाही प्रकार न करता अतिशय शांत पद्धतीने हे आंदोलनं करण्यात आले होते. आंदोलन स्थळी मोठ्यप्रमाणावर तरुण मंडळी जमा झाली होती व अनेक तरुणांनी उपस्थित जन समुदायाला संबोधित केले. मोर्चामध्ये अनेकांनी विविध घोषणाबाजी देत सर्वांचे लक्षवेधून घेतले होते.तसेच मराठा समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व आंदोलनकर्तेवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसह मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनं स्थळी दिग्रस शहरा सह ग्रामीण भागातील मराठा समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©