Home यवतमाळ शंकरलाल कोठारी विद्या मंदिर यवतमाळ यांनी ऑल इंडिया 7 वा नॅशनल डान्स...

शंकरलाल कोठारी विद्या मंदिर यवतमाळ यांनी ऑल इंडिया 7 वा नॅशनल डान्स कॉटेस्ट फेस्टिवल 2023 मध्ये पटकाविला दुसरा क्रमांक 

15

शंकरलाल कोठारी विद्या मंदिर यवतमाळ यांनी ऑल इंडिया 7 वा नॅशनल डान्स कॉटेस्ट फेस्टिवल 2023 मध्ये पटकाविला दुसरा क्रमांक 

ऑल इंडिया 7 वां नॅशनल डान्स कॉटेस्ट फेस्टिवल 2023 मध्ये आयोजित ऑनलाईन डान्स वेस्टर्न ग्रुप गटात संपूर्ण भारतातील शाळांनी सहभाग नोंदविला यामध्ये एकुण 79 शाळांनी ऑनलाईन व्हिडिओ पाठवून सहभाग घेतला. 79 व्हिडिओ पैकी 7 डान्स व्हिडिओ ची निवड करण्यात आली. यात यवतमाळ साठी अभिमानास्पद बातमी म्हणजे शंकरलाल कोठारी विद्या मंदिर यवतमाळ मधील विद्यार्थीनींच्या व्हिडिओ ने दुसरा कमांक पटकविला.

या यशाबद्दल श्री शक्ती सेवा प्रतिष्ठान चे सचिव डॉ. अनुप कोठारी तसेच शंकरलाल कोठारी विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना अनुप कोठारी, गुरूकुल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली अनिल चांडक, प्री-प्रायमरी हेड दुर्गा मिश्रा तसेच सुपरवायजर गणेश सोन्नर व सुषमा मुंदाणे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.

या डान्स ची कोरिओग्राफी सचिन निरडवार सर यांनी केली व विशेष मेहनत घेतली. संस्थेचे सचिव डॉ. अनुप कोठारीनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.यात सहभागी विद्यार्थिनी पलक बत्रा,नान्सी बत्रा,

वैष्णवी झोटिंग,गार्गी भेंडे,अनूष्का कंधारे,दृष्टी तन्ना,श्रेया डफळे,सोमिया तोलवाणी,पूर्वा हेमने,श्रृतिका किन्हीकर,भावना शर्मा,प्राची खैरे,स्वरा पटाळे,सिया शर्मा या असून सर्वांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©