देश भक्तीपर कार्यक्रमांमध्ये जनतेचा जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ शहर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यावतीने आयोजित देशभक्तीपर संगीतसंध्या नेताजी भवन नेताजी चौक येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात प्रचंड मोठ्या प्रमाणात यवतमाळ ची जनता सहभागी झाली होती या भागातील सर्व रस्ते हे प्रचंड गर्दीमुळे बंद झाले होते . कार्यक्रमात मा.आ. विजयाताई धोटे, विजय बुंदेला, क्रांती राऊत (धोटे) भाई अमन, बाबासाहेब चौधरी, किशोर भाऊ सोनटक्के, जितू पाखरे, मतीन भाई तमन्ना, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या इनरव्हील क्लबच्या सदस्य व योगेश धानोरकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गणेश नाईक उपस्थित होते. याप्रसंगी या सर्वांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. या कार्यक्रमात गायक म्हणून नौशाद खान सीमा खान श्रीकांत टकले व जितू पाखरे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लाला राऊत शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व तन्मय त्रिवेदी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रफुल देशमुख, गणेश कोसळकर शेख जाकीर ,राजेंद्र घोंगडे, गोलू कटारिया यांनी केले.
