डोंगरखर्डा ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानीत.
सरपंच, सचीव स्वातंत्र्यदिनी जिल्हाधीकारी कार्यालयात होणार सन्मानित.
सन २०२३साठी अमृतमहोत्सवानिमित्त मिळणाऱ्या राज्य आवास योजना पुरस्कारात कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजना ग्रामीण अंतर्गत अंतर्गत जिल्हयातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन तालुके, तीन क्लस्टर, व तीन ग्रामपंचायती यांच्या निवडीत डोंगरखर्डा ग्रामपंचायतीची निवड झाल्याने १५ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात गौरविण्यात येणार आहे.
१५ऑगस्ट २०२३च्या अमृतमहोत्सव निमित्ताने राज्य आवास योजना महाआवास अभियान टप्पा तीनअंतर्गत गुणांकानुसार जिल्ह्यात कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा ग्रामपंचायतने उत्कृष्ट कार्य करीत जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त केल्याने सदर कार्याची दखल घेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यवतमाळ यांनी स्वातंत्र्यदिनी सरपंच,सचिव व त्यांच्या टीमला उपस्थीत राहण्याचे पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाले असुन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन हा पुरस्कार बहाल करण्यात येणार असुन डोंगरखर्डा ग्रामपंचायतला मिळणाऱ्या पुरस्काराने जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या मानात अधिक भर घातली जाणार आहे.
