पालकमंत्री यांचे कडून महागाव तालुक्यात अतिवृष्टीने झाकेल्या नुकसानीची पाहणी
खडका ता.महागाव येथे अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे
मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी केली. यावेळी या नुकसानीबाबत पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्याच्या सूचना मा. संजय भाऊ राठोड यांनी केल्या. तसेच बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश मा. संजय भाऊ राठोड यांनी दिले.
यावेळी जिल्हा मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
