Home यवतमाळ इंग्लिश मिडीयम स्कूल रुई येथे हरित दिवस साजरा

इंग्लिश मिडीयम स्कूल रुई येथे हरित दिवस साजरा

13

इंग्लिश मिडीयम स्कूल रुई येथे हरित दिवस साजरा

लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल रुई वाई येथे हरित दिवस वृक्ष लावून साजरा. लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज दिनांक 01ऑगस्ट 2023 रोजी हरित दिवस साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे व शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुशीलजी करणेवार होते. हा दिवस साजरा करण्याचे कारण मुख्याध्यापक जावेद अली काझी यांना विचारले असता वृक्षाचे महत्त्व स्पष्ट करीत वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे असे सांगत वृक्षा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती असायला पाहिजे कारण विद्यार्थी हा देशाचा रक्षक आहे ,घटक आहे विद्यार्थ्याला वृक्षा बद्दल संपूर्ण माहिती असायला पाहिजे वृक्षामुळे आपल्याला कोणते फायदे घेता येतात आणि वृक्ष पृथ्वी वरील सजीव सृष्टीवर कसा उपयोगी आहे , वृक्षा मुळे आपल्याला हवा मिळते,सावली मिळते,औषधी बनविता येतात,फळ मिळतात त्याचे जतन करणे पृथ्वी वरील प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे .वृक्ष वाचले तर पाणी पडेल वृक्ष आहे म्हणून ही पृथ्वी आहे एक झाड एक विद्यार्थी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात वृक्षा प्रती आपुलकी असणे आणि जिव्हाळा निर्माण होणे काळाची गरज आहे. अलीकडच्या काळात रस्ते,घरे,मोठमोठ्या इमारती,हॉटेल,हे मोठ्या प्रमाणात बनविल्या जात आहे आणि त्यामध्ये जर झाड मधात आल्यास या झाडाची कत्तली मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे ही कत्तली थांबली पाहिजे मानवास आणि आपल्याला याची जान झाली पाहिजे वृक्षाचे महत्त्व तुम्हाला केव्हा कळेल जेव्हा तुम्ही रुग्णालया मध्ये ऑक्सीजन साठी तर्साल आणि तेव्हा तुम्हाला ऑक्सीजन मिळणार नाही तेव्हा तुम्हाला वृक्षाचे महत्त्व कळेल अशा प्रकारे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रत्येक विद्यार्थ्यास घेऊन एक वृक्ष आणण्यास सांगितले आणि भरपूर विद्यार्थ्यांनी खूप छान छान झाडे आणली त्या मध्ये ,लिंब, वड,पिंपळ,आवळा,गुलाब,शेवंती,मोगरा,कणेरी,अशा विविध प्रकारचे झाड आणले शिक्षकांनी भरपूर प्रमाणात मेहनत घेऊन विद्यार्थ्यांची तयारी चांगल्या प्रकारे करून दिली विद्यार्थ्यांच्या डोक्यावर क्राऊन म्हणजे महाराजा सारखा टोप आणि प्रत्येक विद्यार्थ्याला झाडाच्या पाणा पासून ड्रेस तयार करून दिला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.त्या नंतर शाळेच्या मैदानात सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले.एका विद्यार्थ्याला पूर्ण वृक्षाचा ड्रेस परिधान करण्यास सांगितले आणि एका विद्यार्थ्याला एका हातात कुऱ्हाड घेऊन त्याच्यावर वार करताना दाखविले आणि बाकीच्या विद्यार्थांना त्या लाकूडतोड्यास झाड तोडण्यास विनंती करून थांबविण्यास सांगितले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका नम्रता केवट यांनी केले,तर आभार सहाय्यक शिक्षिका सानिया सय्यद यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी , शाळेच्या सहाय्यक शिक्षिका,रीना केवट ,सहाय्यक शिक्षिका सानिया सय्यद ,सहाय्यक शिक्षिका कल्याणी करपते ,सहाय्यक शिक्षिका साईमा सय्यद ,सहाय्यक शिक्षिका सोनाली कुडमते व शाळेचे शिक्षक इतर कर्मचारी संध्या ताई मोहले, राजिक ,अनिस भाई,अझहर , यांनी भरपूर मेहनत घेतली.

Copyright ©