देवळी प्रतिनिधी:सागर झोरे
पावसाचे पाणी साचल्याने दहा एकर शेतीचे नुकसान
देवळी तालुक्यातील शिरपूर होरे येथील गावालगत असलेली शेतकरी संदीप फागेश्वर भगत यांची दहा एकर शेती(शेत सर्वे नंबर ५३/५४),देवळी तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पावसाच्या पाण्याने थैमान घातल्याने संदीप फागेश्वर भगत यांची दहा एकर शेतीमध्ये असलेले उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आता शेतकऱ्याने जगायचे कशे पहिलेच बँकेचे कर्ज काढून शेती केली होती आणि शेतात पावसाचे पाणी घुसल्याने शेतीचे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे.आता या शेतकरी परिवारावर जगायचे कशे हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
शेतात पावसाचे पाणी साचल्याचे मुख्य कारण शिरपूर ग्रामपंचायत ने गावातील सांडपाण्याचा नाला त्याच शेतीच्या बाजूला काढला तसेच नागपूर तुळजापूर महामार्ग त्याच शेताच्या जवळून गेल्याने त्या महामार्गाचा पाण्याचा उतार त्याच शेतामध्ये काढण्यात आला महामार्गावरील पाणी आणि शिरपूर गावातील नाल्याचे सांडपाणी आणि सतत सुरू असलेल्या पावसाचे पाणी या शेतात घुसल्यामुळे या शेतातील उभे पीक जवळपास पूर्णतः नष्ट झालेले आहे शासनाने या उध्वस्त झालेल्या पिकाची त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकरी संदीप फागेश्वर भगत व त्याच्या परिवाराने केली आहे.
