Home यवतमाळ सामका सेंटर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्या शुभहस्ते सौ....

सामका सेंटर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्या शुभहस्ते सौ. डॉ.अंजली गवार्ले यांचा सत्कार

16

सामका सेंटर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्या शुभहस्ते सौ. डॉ.अंजली गवार्ले यांचा सत्कार

आरोग्य कार्डचे शुभारंभ व वितरण

यवतमाळ निरमय आरोग्यासाठी ज्येष्ठ नागरीक व निवृत्त कर्मचारी यांचेकरीता दि. १६ जुलैला देवी सामका महिला बहुउद्देशिय संस्था द्वारा जिवेत: शरद: हे आरोग्य कार्ड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण व प्रसिध्द मुळव्याध तज्ञ डॉ. सौ. अंजली गवार्ले यांच्या हस्ते शुभारंभ करुन कार्डचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांच्या शुभहस्ते दुबर्द हेल्थ केअर णक्सलन्स अवॉर्ड 2023 ने यवतमाळ येथील सुप्रसिद्ध गवार्ले हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. अंजली गवार्ले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी आरोग्य कार्डचे शुभारंभ व वितरण करण्यात आले. या आरोग्य कार्ड मध्ये दरमहिन्याला बी.पी., शुगर, लिपीड प्रोफाई, किडनी व लिव्हर संबंधित रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरीता ध्यान, योगासने शिकविण्यात येणार आहे.

डॉ. अंजली गवार्ले यांनी यावेळी आरोग्यविषयक मार्गदर्शन आहार, विहार तसेच मलबध्दता, मुळव्याध अशा ज्येष्ठ नागरीकांना होणाऱ्या आजार आणि त्याचे उपचार याविषयी मागदर्शन केले. बायपास सर्जरी, गुडघ्याचे ऑपरेशन, प्रोस्टेड ग्लँडचे ऑपरेशन आणि मानसिक रोगासाठी आयुर्वेदीय चिकित्सा पध्दतीने सामका सेंटरचे संचालक डॉ. पंकज पवार हे उपचार व मार्गदर्शन करणार आहे याचा यवतमाळकरांनी लाभा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Copyright ©