Home महाराष्ट्र दुबई कॉस्मीक युनिवर्स इंटरनॅशनल फॅशन विक येथे यवतमाळच्या परिक्षक (ज्युरी) डॉ. अंजली...

दुबई कॉस्मीक युनिवर्स इंटरनॅशनल फॅशन विक येथे यवतमाळच्या परिक्षक (ज्युरी) डॉ. अंजली गवार्ल हैल्थकेयर एक्सीलेंस अवार्ड ने सन्मानीत

14

दुबई कॉस्मीक युनिवर्स इंटरनॅशनल फॅशन विक येथे यवतमाळच्या परिक्षक (ज्युरी) डॉ. अंजली गवार्ल हैल्थकेयर एक्सीलेंस अवार्ड ने सन्मानीत

हॉटेल ब्रिस्टॉल ५ जुलं दुबई येथे इनफ्रेम व इमिराईट्स इवेंट्स, रेड क्रॉस सोसायटी तसेच दुबई गायनेकोलॉजीकल सोसायटीच्या इंटरनॅशल फॅशन विक मध्ये यवतमाळ येथील डॉ. अंजली गवार्ले या परिक्षक होत्या. ही यवतमाळकरांसाठी मानाची बाब आहे. तसेच त्यांना दुबई गायनेकोलॉजीकल सोसायटी व रेड क्रॉस आयोजित मेडिकल हेल्थकेअर एक्सलन्स अवार्ड ने सन्मानीत करण्यात आहे.

 

या हेल्थकेअर अवार्डसाठी भारतातून कॉमेटोलॉजीस्ट डॉ. ममता छेडा, मुंबई, गायनॅकोलॉजीस्ट डॉ. अनामिका सिंग, रायपुर, डॉ. ज्ञानंदा बांदोडकर तसेच यवतमाळच्या डॉ. अंजली गवाले, डायरेक्टर, गवाले पाईल्स हॉस्पीटल यांना सन्मानीत करण्यात आले.

यामध्ये प्रसिध्द अभिनेता आफताब शिवदासानी, डॉ. शहजादा सिध्दीकी, डॉ. हनिफ शेख, इमिराईटस्, रेड क्रॉस डायरेक्टर डॉ. उषा किरण, दुबई गायनॅकॉलॉली सोसायटी प्रेसिडंट, डॉ. प्रगती ग्रोवर, इनफ्रेम इटच्या डायरेक्टर सुनिता भट यांनी डॉ. अंजली गवार्ले यांना गौरवचिन्ह देवून सन्मानित केले.

या इंटरनॅशनल फॅशन विक मध्ये डॉ. अंजली गवार्ले यांनी शाही सिल्क सारी परिधान करुन भारताचे प्रतिनिधीत्व केले. फैशन वॉकला सिल्क सारी परिधान करुन त्यांनी सर्वांची मने जिंकली.

डॉ. अंजली गवार्ले यांनी सौ. उज्वला मानकर, सामाजिक कार्यकर्त्या, सौ. अश्विनी बमनोटे, सौ. वर्षा मानवटकर, शैक्षणिक क्षेत्रातुन श्रीमती सुनंदा चौरे,मेकओव्हर आर्टीस्ट सौ प्रिया भोर, पुणे, सौ वर्षा चौधरी यांना सर्टिफिकेट ऑफ अप्रीशिएशनने नामांकित केले. सामाजिक, शैक्षणिक, फैशन अशा विविध क्षेत्रातील स्त्रीयांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मान करण्यात आला. डॉ. कविता व डॉ. संतोष बोरकर यांची कन्या मिस नारायणी बोरकर हिने या फॅशन विक मध्ये सहभाग घेतला. अभिनेते आफताब शिवदासानी यांनी मिस नारायणीला डायनामिक पर्सनॅलीटीचे टायटल व गौरवचिन्हने सन्मानित केले

डॉ. अंजली गवार्ले यांनी भारताचं प्रतिनिधीत्व करत पिकॉककॉस्ट्यूम परिधान केला त्यासाठी त्यांच्या डिझायनर सौ प्रिया ठाकरे यांनाही उत्कृष्ट डिझायनर म्हणुन सटीफीकेट ऑफ अप्रीसीएशन देण्यात आले.

Copyright ©