विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने उत्साहात स्वागत
जिल्हा परिषद मराठी पूर्व उच्च माध्यमिक शाळा बोरी अडगाव, येथे नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा व मागील वर्षी शाळेमध्ये दाखल असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सुरवातीला गावातून प्रभात फेरी काढुन गामधून जागृती मोहीम राबविण्यात आली. नंतर विविध ८ पद्धतीचे वैचारिक संदेश देणारे टेबल लावून मुलांना शैक्षणिक माहिती देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश कुमार चोपडे, आझाद नारी फाउंडेशन चे संचालक- राहुल सुरवाडे, शाळा समितीचे अध्यक्ष-गौतम सुरवाडे, कपिलदेव अवचार, बुंदेले सर ,कानपुरे सर , चव्हाण सर, होगे मॅडम बाटे भाऊ तसेच अंगणवाडी सेविका, सुमित्रा खरात, शारदा टीकार , शेहनाज पठाण, निर्मला बोचरे, सीता टीकार ललिता सुरवाडे सायरा बानो, सत्यपाल सुरवाडे, व पालक वर्ग उपस्थित होते.
