बेलोरा ग्रामपंचायत कडून गावाला दूषित पाणी पुरवठा
शिवसेना महिला आघाडीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत बेलोरा ग्रामपंचायत कडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो ते संपूर्ण पाणी दूषित असल्याने नळाद्वारे पाण्यासोबत अनेक जीव जंतू येत असल्याने अनेकाना साथीचे आजार होत आहे तर येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे मागील अनेक दिवसा पासुन हा प्रकार सुरू असल्याने या बाबत ग्रामापच्यायतीला सूचना हि देण्यात आल्या मात्र जाणून बुजून या कडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने येथून पाण्या द्वारे आलेले अनेक जीव घेणे जीव जंतू ची भेट गटविकास अधिकारी गड्डापोड यांना शिवसेना महिला आघाडीने दिली येथील ग्रामस्थ त्रस्त झाले असून संबंधित अधिकारी या कडे लक्ष देत नाही या प्रकरणी त्वरित दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईन ने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या कल्पना ताई दरवई यांनी दिला या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा संघटीका कल्पनाताई दरवई तालुका प्रमुख अंजलिताई गिरी,शहर प्रमुख सूनिताताई टाके,उपशहर प्रमुख प्रतिभाताई हरणखेडे ह्या उपस्थित होत्या
