चिकणी येथे बंजारा समाज घरकुलां पासून वंचित
दारव्हा पंचायत समिती अंतर्गत चिकणी कामठवाडा येथील बंजारा समाज गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे गोकी प्रकल्पात अनेक बंजारा बांधवांची घरे गेली आहेत गोकी प्रकल्प अंतर्गत पाथ्रड देवी तलावा झाल्याने त्या तलावात अनेकांची घरे गेली त्या मुळे तेथील नागरीकांचे स्थलांतर करून अनेकाना खोटे आश्वासन देत पक्के घर देऊ म्हणून त्यांना आश्वासन देण्यात आले परंतु अजूनही घरे तर दिलेच नाही पण शासनाच्या घरकुल योजनेचा हि लाभ कुणाला देण्यात आला नसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.या वेळी बंजारा समाजातील व इतर समाजाच्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आले त्यांच्या निवासाकरिता शासनाने कोणतेच प्रकारची व्यवस्था तर केलीच नाही मात्र अजून शासनाने येथील गरीब गरजू लोकांना कोणत्याच प्रकारे घरकुलाचा लाभ दिला नाही कच्चे घर बांधून आपलाली उपजीविका करत असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरे जमीनदोष झाले कसेबसे आपला संसार थाटला असून या ठिकाणी घरकुलाची अत्यंत आवश्यकता असतानाही याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे यांच्या निवाऱ्याचा प्रश्न आजही ऐरणीवर असल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आहेत बंजारा समाज भोई समाज यांना पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहे सतत पंचायत समितीच्या प्रदक्षिणात घालत असल्याने यांच्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन तातडीने घरकुल देण्याची मागणी नुकतीच करण्यात आली आहे यावेळी दत्ता दशरथ बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रामधन हरीचंद्र जाधव जयसिंग चंदू जाधव गजानन कडू राठोड लक्ष्मण किसन जाधव विजय कडू राठोड भगवान रामदास जाधव मधुकर हरिचंद्र जाधव रामदास पेरू राठोड व सुशीला राजू चव्हाण यांनी निवेदन देऊन घरकुलाची मागणी केली आहे
