Home महाराष्ट्र मुंबईतील चर्चगेट परिसरातील चौकास भगवान मुंगसाजी माऊलींचे नाव लवकरच स्मृतीशिल्प उभारणार

मुंबईतील चर्चगेट परिसरातील चौकास भगवान मुंगसाजी माऊलींचे नाव लवकरच स्मृतीशिल्प उभारणार

16

मुंबईतील चर्चगेट परिसरातील चौकास भगवान मुंगसाजी माऊलींचे नाव लवकरच स्मृतीशिल्प उभारणार

मंत्री संजय राठोड यांनी पूर्ण केली भक्तांची मागणी

यवतमाळ – दारव्हा येथील धामणगाव देव येथील भगवान मुंगसाजी माऊली यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील चौकाचे श्री मुंगसाजी माऊली चौक असे नामकरण करण्यात आले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी श्री मुंगसाजी माऊली भक्तांची अनेक वर्षांची ही मागणी प्रशासनाकडे पाठपुरावा करून पूर्ण केली.

ना. संजय राठोड यांनी आज बुधवारी सकाळी चर्चगेट (मुंबई) येथील या चौकाची पाहणी केली. चौकाच्या दर्शनी भागात वाहतूक बेटाचे सुशोभिकरण करून त्या ठिकाणी भगवान श्री मुंगसाजी माऊली यांच्या आध्यात्मिक व सामाजिक सेवाकार्याची माहिती देणारे स्मृतीशिल्प उभारण्यासाठी प्रक्रिया करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी मनपा उपायुक्त शुभांगी हसनाळे, सहायक आयुक्त गुरव, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी बाभळ यांच्यासह महानगरपालिका व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©